Header Ads

वर्धा येथे पॉझिटिव्ह आलेला तो रुग्ण मंगरुळपीर तालुक्याचा

वर्धा येथे पॉझिटिव्ह आलेला तो रुग्ण मंगरुळपीर तालुक्याचा

रुग्णाचे संपर्कातील व्यक्तींची माहिती जिल्हा प्रशासन घेत आहे



वाशिम (जनता परिषद) दि. १० - आज ग्रिन झोन मध्ये आत्तापर्यंत असलेले वर्धा येेथे दोन रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यांतील एक रुग्ण हा मंगरुळपीर तालुक्यातील ग्राम कवठळ येथील आहे. सदरहू रुग्णाला सावंगी येथील रुग्णालयात उपचारार्थ शनीवार रोजी रेफर केले नुसार भरती करण्यात आले होते, अशी प्रार्थमिक माहिती आहे. तेथे त्याची टेस्ट झाली व तो पॉझिटिव्ह आला आहे. 
हि सर्व प्रार्थमिक माहिती असून याबाबत वाशिम जिल्हा प्रशासन सखोल माहिती घेत असून सदर व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींची माहिती संकलीत करुन पुढील कार्यवाही करण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.