Header Ads

कारंजा, मंगरुळसह जिल्ह्याची चिंता पुन्हा वाढली

कारंजा, मंगरुळसह जिल्ह्याची चिंता पुन्हा वाढली 

कवठळ येथील कोरोना रुग्णाने घेतले होते कारंजा येथील सर्वात जुने नामांकीत डॉक्टर कडे उपचार

डॉक्टर सह इतर ३ असे ४ जण वाशिमला पाठविले

उपविभागीय दंडाधिकारी मंगरुळपीर यांच्या आदेशावरुन कवठळ गांवात मनाई हुकुम


कारंजा (जनता परिषद) दि.१० - वर्धा येथे उपचार घेणारा कवठळ येथील रुग्ण हा कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे आज वर्धा येथे प्राप्त रिपोर्ट वरुन समोेर आले. सरदहू व्यक्ती दिनांक ३० एप्रील ते ४ मे पर्यंत कारंजा येथील प्रतिष्ठीत सिनीअर डॉक्टर यांचे कडे भरती होता. त्यामुळे ह्या डॉक्टर सह इतर ३ असे एकूण ४ जणांना वाशिमला पाठविण्यात येत असल्याची अधिकृत माहिती तहसीलदार धिरज मांजरे यांनी दिली. तसेच SDH मध्ये तपासणी साठी आलेले दोन रुग्ण ही वाशिम येथे पाठविणार आहे.
आजच नेर येथील शिक्षक रुग्णाचे संबंधातील उपचार करणारे कारंजा येथील प्रतिष्ठित डॉक्टर, त्यांचे सहकारी व रुग्णाचे नातेवाईक असे एकुण १३ रिपोर्ट हे निगेटिव्ह आले होते. त्याचा आनंद कारंजेकरांनी पूर्णपणे घेतला नाही इतक्यातच पुन्हा जुने, जानते आणि सिनीअर डॉक्टर यांच्याकडे जो पेशंट ३-४ दिवस ऍडमिट होता तो पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा जिव भांड्यात पडला आहे. 
ज्या प्रमाणे कारंजातील पहिले डॉक्टर व चमु ह्यांचा रिपोर्ट निल आला तसाच अत्यंत सोज्वळ स्वभावाचे, मनमिळावू व संपूर्ण जिवन कारंजाकरांचे सेवेत दिलेेले अनुभवी असलेले डॉक्टर यांचाही येईलच अशी प्रार्थना कारंजातील सर्वच जाती, धर्म, पंथाचे नागरिक करीत आहेत. 
कोरोनाच्या या महाभयंकर युद्धात डॉक्टर व वैद्यकीय जगत, पोलिस व सुरक्षा यंत्रणा, महसुल व संपूर्ण शासकीय यंत्रणा, स्वच्छता प्रमुख व संपूर्ण विभाग हे जीव मुठीत घेऊन सामान्यांचे जीव वाचविण्यासाठी अतोनात मेहनत घेत आहेत. कोणत्याही व्यक्तीच्या चेहर्‍यावर तो कोरोनाग्रस्त असेल असे नसल्याने वैद्यकीय, सुरक्षा, स्वच्छता, महसुल, सह सर्वच शासकीय यंत्रणा, पत्रकार बांधव  व सामाजीक कार्यकर्ते ह्यांचेसाठी ही लढाई खरेच जिकरीची होते आहे. 

उपविभागीय दंडाधिकारी, मंगरुळपीर यांच्या आदेशान्वये कवठळ गांव सिल पुढील आदेशापर्यंत या भागातील सर्व इसमांना फिरण्यास मज्जाव 

दरम्यान, मंगरुळपीर तालुक्यातील ग्राम कवठळ साठी उपविभागीय दंडाधिकारी, मंगरुळपीर यांनी जारी केेलेल्या एका आदेशानुसार संसर्ग वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ३ किलोमिटर पर्यंत भाग हा नागरिकांची हालचाल/फिरणे/संपर्क यावर निर्बंध घातले आहेत.  हे आदेश आज दिनांक १० मे रोजी सायंकाळी ६.०० पासून लागू करण्यात आले आहे. मंगरुळपीर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे यांच्या आदेशानुसार संपूर्ण कवठळ गांव भागात (गावाकडे येणारे सर्व प्रकारचे रस्ते, हद्दी, व त्या हद्दीतील भौगोलीक क्षेत्रात समाविष्ठ निवास व व्यापार क्षेत्र सह) पुढील आदेशापर्यंत सर्व इसमांना फिरण्यास मज्जाव करण्याकरीता फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार मनाई हुकुम आदेश लागू करण्यात आला आहे. 

No comments

Powered by Blogger.