Header Ads

आदिती लोखंडे ने केले कोरोना जागृती गित सादर

आदिती लोखंडे ने केले कोरोना जागृती गित सादर

मराठी पत्रकार परिषद व पोलीस प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

   मालेगाव ता 8  - आदिती प्रशांत लोखंडे हीने आज ता 8 रोजी  कोरोना जागृती गित सादर केले .मालेगाव शहरातील शिवचौक येथे सकाळी 9.00 वाजता तालुका, मराठी पत्रकार परिषद व पोलीस प्रशासनाने हा उपक्रम आयोजित केला होता
          यावेळी आदिती ने 'इस जमाने मे न जाने क्यू लोग घरोसे निकला करते है ! ' हे गीत सादर केले कोरोना संबंधि करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजना ची माहिती त्यानी या गाण्यातून दिली .त्याला उपस्थितानी चांगला प्रतिसाद दिला. यावेळी मालेगावचे ठाणेदार आधारसिंग सोनोने, तालुका मराठी पत्रकार परिषदेतचे अध्यक्ष प्रा अरविंद गाभणे ,सचिव शिवाजीराव खडसे ,जिल्ह्या कार्यकारिणी सदस्य वसंतराव अवचार, इम्रान खान, गणेश मोहळे, यशवंतराव हिवराळे, प्रशांत लोखंडे, किरण पखाले, सेवाराम आडे, संदीप भातुडकर, चंद्रकांत गायकवाड, दीपक सारडा, सुभाष बळी, दत्तात्रय शिंदें, नायक पोलिस कॉन्स्टेबल रामविलास गुप्ता गोपीनिय शाखेचे सुधीर सोळंके, कु राखी लोखंडे आदी उपस्थित होते .
         यावेळी ठाणेदार सोनोने म्हणाले की, नागरिकांनी लॉक डाऊनचे नियम पाळून प्रशासनास सहकार्य केले पाहिजे. कार्यक्रमात प्रा अरविंद गाभणे, इम्रान खान. शिवाजीराव खडसे, यशवंतराव हिवराळे, सेवाराम आडे आदींनी विचार व्यक्त केले





No comments

Powered by Blogger.