Header Ads

स्थलांतरित आदिवासी मजुरांसाठी हेल्पलाईन


स्थलांतरित आदिवासी मजुरांसाठी हेल्पलाईन

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचा उपक्रम


वाशिम, दि. ०८ (जिमाका) : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी २४ मार्च पासून संचारबंदी व लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. या कालावधीत स्थलांतरित आदिवासी मजूर राज्यात व परराज्यात विविध ठिकाणी अडलेलेल आहेत. अशा स्थलांतरित आदिवासी मजुरांचा शोध घेवून त्यांना पुढील मार्गदर्शन व आवश्यक सहकार्य करण्यासाठी अकोला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने हेल्पलाईन सुरु केली असून स्थलांतरीत आदिवासी मजुरांची माहिती या हेल्पलाईन क्रमांकावर द्यावी, असे आवाहन प्रकल्प अधिकारी ममता विधळे यांनी केले आहे.
अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील स्थलांतरित आदिवासी मजुरांची माहिती प्रकल्पस्तरीय हेल्पलाईन कक्षाला सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत या कालावधीत ८४५९७८०६९९ किंवा ८६०५५०९६८३ या हेल्पलाईन क्रमांकावर द्यावी. त्याचप्रमाणे ज्या क्षेत्रामध्ये स्थलांतर केले आहे, तेथील प्रशासनाकडे नोंदणी करून प्रवासाकरिता ई-पास प्राप्त करून घ्यावी. शासनाने ठरवून दिलेल्या सर्व बाबींचे पालन करावे, असे श्रीमती विधळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

No comments

Powered by Blogger.