Header Ads

देशाचे प्रधानांनी दिली नागरिकांना सप्तपदी

देशाचे प्रधानांनी दिली नागरिकांना सप्तपदी 
LOCKDOWN २.० : ३ मे पर्यत वाढले 
२० एप्रील पर्यंत सद्यस्थिती कायम राहणार 

नवी दिल्ली (जनता परिषद) दि. १४ - देशाचे शिर्षस्थ नेतृत्व, प्रधानमंत्री मा.नरेंद्र मोदी यांनी आज महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी नागरिकांनी दाखविली संकल्प शक्ती ही श्रद्धांजली आहे, असे मत व्यक्त केले.
* २१ दिवसांच्या झालेल्या लॉकडाऊन नंतर आता लॉकडाऊनचा दुसरा भाग ३ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे.
* २० एप्रील पर्यंत सद्यस्थिती कायम राहणार असून त्यानंतर त्या-त्या भागातील स्थिती पाहून किती व कशी शिथीलता द्यावी याचा विचार केल्या जाणार आहे.
* उद्या दि. १५ एप्रील रोजी केंद्र शासन लॉकडाऊनचे संदर्भात इत्यंभूत नूतन गाईडलाईन देणार असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.
* देशात पहिला कोरोना पॉझिटिव्ह सापडल्या बरोबरच दुसर्‍या देशाहून येणार्‍या नागरिकांची एअरपोर्टवर तपासणी ही तात्काळ रुपात सुरु करण्यात आली होती. तर ५५० पेशंट झाल्याबरोबरच संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु करुन परिस्थितीवर सर्वच जनतेच्या सहकार्याने वचक मिळविण्यात आला.
* देशातील जनतेने दिलेल्या सहकार्य बद्दल धन्यवाद करीत कोरोना योद्धा ज्यांच्यामध्ये आरोग्य विभाग, सुरक्षा यंत्रणा, स्वच्छता विभाग यांचे विशेष करुन त्यांनी यावेळी आभार मानले.
* देशात जे हॉटस्पॉट आहेत तेथे लॉकडाऊन ची अंमलबजावणी जास्त कडकपणे करण्यात येणार असून जेथे नव्याने हॉटस्पॉट होण्याची शक्यता दिसून येणार आहे तेथे जास्त लक्ष्य दिले जाण्याची गरज आहे.
* देशात औषध व अन्नधान्यची मुबलकता आहे, नागरिकांनी त्याची चिंता करु नये.
* लॉकडाऊन मुळे आर्थिकरित्या खुप नुकसान झालेले आहे मात्र प्रत्येक भारतीयाचे जिवित्व त्यापेक्षा जास्त महत्वाचे आहे, असेही ते म्हणाले.
पंतप्रधानांनी दिली सप्तपदी 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सर्वच देशवासीयांना सप्तपदी दिली असून कोरोना सोबतचे युद्ध जिंकणेसाठी त्याचे तंतोतंत पालन करण्यात यावे असे आवाहन केले आहे.
१) आपले घरातील वृद्धांचे लक्ष्य ठेवा विशेष करुन ज्यांना जुना आजार आहे, त्याची विशेष काळजी घेणे गरजेचे
२) लॉकडाऊन व सोशियल डिसटेंसींग लक्ष्मणरेषेचे अत्यंत कठोरपणे पालन करा.
३) घरी बनलेले मास्कचा भरपूर व अनिवार्य वापर करा. प्रतिकार शक्ती वाढविणेसाठी आरोग्य विभागाने निर्देशीत केलेनुसार गरम पाणी पिणे, काढा पिणे आदींसारखे घरगुती प्रयोग शक्य तितक्या जास्त प्रमाणात करणे गरजेचे
४) आरोग्यसेतू हा मोबाईल ऍप सर्वांनी डाऊनलोड करावा व इतरांनाही याबाबत सांगावे
५) आपले आजूबाजूला असलेल्या गरीब परिवारांची काळजी घ्या त्यांच्या जेवणाची सोय करा.
६) आपले येथे काम करणार्‍या कर्मचार्‍यांची काळजी घ्या, त्यांना नोकरीवरुन काढू नका.
७) विशेष करुन कोरोना योद्धा ज्यांच्यामध्ये विशेष करुन आरोग्य विभाग, सुरक्षा विभाग, स्वच्छता विभाग यांचा सन्मान करा, त्यांचा आदर करुन त्यांचा धन्यवाद करा. 

No comments

Powered by Blogger.