Header Ads

कोरोना संसर्गीत रुग्णाचे संपर्कातील १२ जणांचे अहवाल निगेटिव्ह


समाधानकारक.....

कोरोना संसर्गीत रुग्णाचे संपर्कातील १२ जणांचे अहवाल निगेटिव्ह

वाशिम (जनता परिषद) दि.5 - वाशिम जिल्ह्यातील पहिल्या कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या नजीकच्या संपर्कातील सर्व १२ जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत, ही एक समाधानकारक अशी गोष्ट ठरली आहे. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. 
जिल्ह्यातील आतापावेतो १७ रुग्णांचे स्वॅब हे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यांतील १२ रुग्णांचे अहवाल आज प्राप्त झालेत आणि ते सर्व निगेटिव्ह आलेले आहेत. तर २ पुर्वीच निगेटीव्ह आले होते. २ नमुन्यांचे अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 
जिल्ह्यातील १२ व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणात (Institutional Quarantine) तर १५ व्यक्तींना अलगीकरण (Isolation) मध्ये ठेवण्यात आलेले आहे. 

No comments

Powered by Blogger.