Header Ads

जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या आदेशाची कारंजा ग्रामीण पोलिसांकडुन कडक अंमलबजावणी


जिल्हा  पोलीस अधिक्षकांच्या आदेशाची 

कारंजा ग्रामीण पोलिसांकडुन कडक अंमलबजावणी

रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट : उंबडाॅबाजार परिसरातील चित्र

          उंबडाॅबाजार ( वार्ताहर ) -  वाशिम जिल्हापोलीस अधिक्षक वसंत परदेशी यांच्या आदेशाची कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशन चे ठाणेदार दिगांबर इंगळे यांनी यांनी ग्रामीण भागात कडक अंमलबजावणी सुरू केल्याने आता ग्रामीण भागात सुध्दा सर्वत्र  शुकशुकाट पहावयास मिळत आहे.
       सविस्तर असे की कोरोणा विषाणु जन्यरोगाला पायबंद घालण्यासाठी केन्द्र शासनाने २१ दिवसांचा लाॅकडाउन घोषित असतांना काही नागरिक मात्र सकाळी ८ते १२ या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी सुट असतांना सुध्दा विनाकारण रस्त्यावर यायचे यामुळे रस्त्यावर विनाकारण गर्दी दिसायची .
        यामध्ये काही महाभाग लाॅकडाउन मध्ये सुध्दा बाहेर पडत असल्याने जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या आदेशाची कडक अंमलबजावणी  कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशन चे ठाणेदार दिगांबर इंगळे यांनी ग्रामीण भागात कडक अंमलबजावणी सुरू केल्याने  विनाकारण रस्त्यावर फिरणा-या नागरिकांना लगाम लागला असुन पोलीस कारवाई च्या भितीने लाॅकडाउन च्या दरम्यान रस्ते निरमनुष्य  दिसत आहे



No comments

Powered by Blogger.