Header Ads

लॉकडाऊन २.० साठी गृहमंत्रालयाने जारी केले दिशानिर्देश

लॉकडाऊन २.० साठी गृहमंत्रालयाने जारी केले दिशानिर्देश 

नवी दिल्ली (जनता परिषद) दि.१५ - काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवितांना सांगितल्यानुसार आज रोजी केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाऊन २.० काळासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. 
यातील बहुतांश बाबतीत जिल्हा दंडाधिकार्‍यांनी आपत्ती व्यवस्थापन २००५ नुसार दंडासह गुन्हे कायम करण्याबाबत नियमन करावे असेही निर्देश देण्यात आलेले आहे. 
यांतील महत्वाचे निर्णय हे पुढील प्रमाणे आहेत. 

*** सार्वजनीक जागांसाठीचे निर्देश 

१) सार्वजनीक ठिकाणी व कामाच्या ठिकाणी चेहरा झाकणे म्हणजे मास्क घालणे बंधनकारक करण्यात  आलेले आहे. 
२) डेलळरश्र ऊळीींरपलळपस अत्यंत कडकरित्या राबविणे अत्यावश्यक 
३) कुठल्याही संस्थेने पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्याची परवानगी देऊ नये
४) लग्न व अंत्यसंस्कारचे वेळेस जिल्हादंडाधिकार्‍यांनी आदेशीत केले पेक्षा जास्त उपस्थितीवर बंदी.  
५) सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍यांवर दंड आकारण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. 
६) दारु, गुडखा, तंबाखूची विक्री यावर कडक बंदी ठेवण्यात यावी. 

*** कार्याच्या स्थळांसाठीचे निर्देश  

७) इसमांचे ताप मोजणेसाठीची व्यवस्था असावी तसेच योग्यठिकाणी सॅनीटायझरची उपलब्धता ठेवणे आवश्यक 
८) दोन शिफ्ट मधे किमान एका तासाचे अंतर असणे गरजेचे कर्मचार्‍यांचे जेवणाचे स्थळी सोशियल डिसटेंसींग ठेवणे गरजेचे 
९) ६५ वर्षावरील, ५ वर्षापेक्षा कमी वय असणारे पालक यांना घरुन काम करण्याची मुभा देण्यात यावी. 
१०) शासकीय व खाजगी कार्यालयातील कर्मचार्‍यांना आरोग्य सेतू ऍप वापरण्यासाठी प्रोत्साहन देण्यात यावे 
११) शिफ्टचे मध्यात कामाचे जागांचे नियमीत सॅनीटायझेशन होणे गरजेचे 
१२) जास्त संख्येत एकत्र येणे टाळणे गरजेचे 

*** उत्पादक स्थळांसाठीचे निर्देश 

१३) नियमीत व जास्तीत जास्त वापरात येणारे पृष्ठभागाचे सॅनीटायझेशन करावे तसेच नियमीत हात धुणे आवश्यक 
१४) भोजनकक्ष किंवा उपहारगृहात सोशियल डिसटेंसींग चे पालन अत्यावश्यक राहील
१५) आरोग्यदायक उपाययोजनांबाबत नियमीत मार्गदर्शन करणे गरजेचे राहील. 

खालील गोष्टींबर पुर्ण निर्बंध असणार आहेत

१) रेल्वे, रस्ते आणि विमान वाहतूकीवर बंदी 
२) शाळा, महाविद्यालये, कंपन्या, हॉटेल यांवर बंदी 
३) सिनेमा हॉल, मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, जिम यांवर बंदी 
४) राजकीय सभा, धार्मिक कार्यक्रम यांबर बंदी 
५) ३ मे पर्यंत सर्व धार्मिक स्थळे बंद राहतील 
६) अंत्यविधीमध्ये २० पेक्षा जास्त लोकांचा सहभाग राहणार नाही.
२० एप्रील नंतर जेथे कोरोनाचा प्रभाव कमी आहे अशा ठिकाणी हळूहळू काही क्षेत्रांमध्ये टप्प्या-टप्प्याने शिथीलता देण्यात येणार आहेत. यामध्ये १) कुरिअर सेवा २) मोटर मेकॅनीक, कारपेंटर, इलेक्ट्रिशियन, प्लंबर लोकांना काम करण्याची परवानगी देणे ३) लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या लोकांसाठी हॉटेल व लॉज सुरु करण्यास परवानगी ४) रस्ते व इमारत बांधकामांना परवानगी ५) आयटी कंपन्या व र्ई-कॉमर्स कंपन्यांना काम करण्याची परवानगी देणे बाबतचे निर्णय आहेत. 

No comments

Powered by Blogger.