Header Ads

आज रोजी प्राप्त वाशिम जिल्ह्याचे सहाही रिपोर्ट निगेटिव्ह


आज रोजी प्राप्त वाशिम जिल्ह्याचे सहाही रिपोर्ट निगेटिव्ह 

जिल्हा शल्य चिकित्सक यांची माहिती

वाशिम (जनता परिषद) ता. ८ - वाशिम जिल्ह्यातील एकुण २३ जणांचे स्वॉब नमुने आतापावेतो पाठविण्यात आले होते. त्यातील काल पर्यंत प्राप्त १७ अहवालातून १ पॉझिटिव्ह तर उर्वरित १६ निगेटिव्ह आले होते. अप्राप्त राहिलेले ६ नुमन्यांचे आज ८ एप्रील रोजी रिपोर्ट आले असून सर्व रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सव डॉ. सोनटक्के यांचेवतीने जिल्हा माहिती कार्यालय द्वारा देण्यात आली आहे. 
आज रोजी गृह अलगीकरणात (Home Quarantine) ठेवलेल्या व्यक्तींची संख्या ही १८ असून संस्थात्मक विलगीकरणात (Institutional Quarantine) १ व्यक्तीला ठेवण्यात आलेले आहे. तर अलगीकरणात (Isolation) ७ व्यक्ती आहेत. 

No comments

Powered by Blogger.