Header Ads

कारंजाचे तहसिलदार धिरज मांजरे यांचे आवाहन

कारंजाचे तहसिलदार धिरज मांजरे यांचे आवाहन

नागरिकांनी स्वस्त धान्य दुकानांवर गर्दी न करता टोकननुसार दिलेल्या वेळेवर येऊन धान्य न्यावे 

उद्यापासून मोफत तांदूळ चे होणार वाटप 

कारंजा (जनता परिषद) दि.८ - शासनाने निर्देशीत केल्याप्रमाणे उद्या दि.९ एप्रील रोजी सकाळी ८ वाजेपासून मोफत तांदूळचे स्वस्त धान्य दुकानांतून वाटप केले जाणार आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत प्राधान्य गट योजना तसेच अंत्योदय गट योजनेतील लाभार्थ्यांना पाच किलो प्रती व्यक्ती याप्रमाणे हे वाटप होणार आहे. 
सदर योजनेतील तांदूळ पुरेशा प्रमाणामध्ये रास्त भाव दुकानांमध्ये उपलब्ध आहे. एकाच दिवसात स्वस्त धान्य दुकानातील सर्व धान्य संपेल की काय? असा समज करुन घेऊन सर्व कार्डधारक पहिल्याच दिवशी रास्त भाव दुकानांसमोर गर्दी करतात. आपल्या लहान मुला मुलींना सोबत घेऊन रास्त भाव दुकानात येतात तसेच आखून दिलेल्या चौकोनात उभे न राहता इतरत्र उभे राहतात व त्यामुळे सामाजिक अंत पाळले जात नाही. 
यासाठी कारंजाचे तहसिलदार धिरज मांजरे यांनी नागरिकांनी रास्तभाव दुकाना समोर गर्दी करु नये. रास्त भाव दुकानदार मार्फत आपणांस मिळालेल्या टोकनवर नमूद वेळेवरच रास्तभाव दुकानात येऊन धान्य घेऊन जावे. नागरिकांनी आपल्या तसेच इतरांच्याही आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे. 

No comments

Powered by Blogger.