Header Ads

भ.महावीर जयंती निमित्त सकल जैन बांधव समाजाचे स्तूत्य कार्य


भ.महावीर जयंती निमित्त सकल जैन बांधव समाजाचे स्तूत्य कार्य 

० गरजूंना किराणा किटचे वाटप 

तहसील परिसरात तहसीलदार मांजरे यांचे हस्ते वितरण

           कारंजा (जनता परिषद) दि. ६ - आज श्री भगवान महावीर यांची जयंती. भूतदया, जीवदया, अहिंसा परमो धर्म ह्याचे प्रचार व प्रसार जनमाणसांत करुन संपूर्ण जगाला मानवतेचा संदेश भगवान महावीर यांनी दिला. कोरोना ह्या मानवतेच्या शत्रुचे विरोधात लढा देण्यासाठी आज महाविर जयंती रोजी कोणताही कार्यक्रम आयोजीत करण्यात आला नाही. 
       जैन सेवादलाने बघेरवाल जैन समाज बांधवांकडून शहरातील गरजू कुटुंबांकरीता अन्नदान करण्याचे आवाहन केले. त्याला समाजबांधवांनी प्रतिसाद देत युवकांचा उत्साह वाढविला. इतकेच नव्हे तर, अखिल भारतीय जैन दिगांबर बहेरवाल संघ, जैन सेवादल, सकल जैन बांधव समाजाने शासकीय नियमानुसार निराधारांसाठी १०० किराणा किटचे वाटप करण्याचे ठरवून एक स्तुत्य असे कार्य केले. 
भगवान महाविर यांच्या संदेशाचे पालन करीत शासनाने दिलेल्या दिशा निर्देशानुसार सकल जैन बांधव समाजाने महावीर जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द केले होते. सकाळी ९ वाजता स्थानीक सन्मती भवन येथे शिरीष चवरे, डॉ.शार्दुल डोणगांवकर तसेच जगदीश चवरे यांचे हस्ते भगवान महाविर यांचे प्रतिमेला हारार्पण करुन पुजन करण्यात आले. समाजात वैद्यकीय सेवा प्रदान करणार्‍या डॉ.शार्दुल डोणगांवकर यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. गरजूंना किराणा किटचे वाटप करण्यात आले. 
तद्नंतर स्थानीक तहसील येथे तहसीलदार धीरज मांजरे व सहकारी यांचे सह भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पुजन केले. तहसील प्रांगणात तहसीलदार, सहकारी व सकल जैन समाज बांधव यांच्या उपस्थितीत सोशियल डिस्टंसिंग चे पालन करीत तहसीलदार यांचे हस्ते निराधारांना किराणा किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी महोत्सव समितीचे सचिव संदेश जिंतूरकर, धनंजय गहाणकरी, पराग गहाणकरी, भारत हरसूले, प्रफुल्ल बाणगांवकर, मनीष भेलांडे, सुदर्शन दर्यांपूरकर, संदिप दर्यापुरकर, नितीन जैन, विजय जिंतूरकर, प्रसन्ना आग्रेकर आदि जैन बांधवांसह महसुल विभाागाचे नायब तहसीलदार हरणे, तलाठी संदिप गुल्हाने, महेश धानोरकर तसेच स्वयंसेवक छगन वाघमारे, गजानन आसरे आदि उपस्थित होते. 

No comments

Powered by Blogger.