Header Ads

॥ तमसो मा ज्योतिर्गमय ॥


कारंजा जगमगले दिव्यांचे रोषणाईने 
॥ तमसो मा ज्योतिर्गमय ॥

हे प्रभू, हमे अंधकार से प्रकाश की ओर ले चलो. देवा, आम्हाला अंधारातून उजेळाकडे घेऊन जा. 

O Lord, Lead Us From Darkness to Light

कारंजा (जनता परिषद) दि. ५ - देशाचे प्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार संपूर्ण भारताप्रमाणेच कारंजा शहरात सर्वत्र दिव्यांची रोषणाई दिसून आली. दिवाळीचा आनंदोत्सवच जणू संपूर्ण कारंजा शहराने साजरा केला. संपूर्ण देश एकसंघ कसा उभा राहतो, याचे ज्वलंत उदाहरण प्रत्येक भारतीयाला आज एक वेगळीच उर्जा देता झाला. जात, धर्म, पंथ सोडून शहरातील बहुतांश घरांचे लाईट हे पंतप्रधानांचे आवाहनला ओ देत ठिक रात्रौ ९.०० वाजता बंद करण्यात आले होते. 
अनेकोंनी आपल्या घरांसमोर, गॅलरीत, गच्चीवर दिव्यांची रोषणाई केली होती.  अनेकांनी कॅण्डल व अनेकांनी मोबाईल चे फ्लॅशलाईटची रोषणाई करीत एक वेगळीच उर्जा वातावरणात निर्माण केली होती. शहरातील अनेक भागांतून जगाचा शत्रु बनलेल्या कोरोनाचे विरोधात शंखध्वनीही केल्या गेली. तालुक्यात ठिकठिकाणी विविध ग्रामीण भागांमध्येही अशाच प्रकारे रोषणाईने तिमीरावर मात करण्यासाठी आम्ही सर्व एक आहोत हे सिद्ध केले गेले. 
खरे पाहता, सर्व भारतीय एक आहेत, आम्हाला अंधारातून उजेळाकडे जावयाचे आहे, कोरोना ह्या रोगाचे विरोधात आमचे संकल्प दृढ असून याचा आम्ही सर्व १३५ कोटी भारतीय एकोप्याने मुकाबला करणार ह्या मानसिकतेला मजबूती देण्यासाठीचा हा एक प्रतिकात्मक प्रयत्न होता, जो यशस्वी ठरला. 

असतो मा सद्गमय | तमसो मा ज्योतिर्गमय | मृत्योर्मामृतं गमय ॥


No comments

Powered by Blogger.