Header Ads

वाशिम जिल्ह्यात कोरोनाची पहिली पॉझिटिव्ह केस


वाशिम जिल्ह्यात कोरोनाची पहिली पॉझिटिव्ह केस 


सदरहू इसम दिल्ली येथील मरकजचा सहभागी 


वाशिम दि.३ - आज रोजी जिल्ह्यातील एक रुग्ण कोरोना पॉझीटिव्ह आल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. 
प्राप्त माहिती नुसार, हा इसम दिल्ली येथे भरलेल्या मरकज चे जमात मध्ये गेला होता, अशी माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली होती. मात्र सदरहू इसमाने मात्र यावर नकार दिला होता. तरीही खबरदारी म्हणून सदरहू इसमास जिल्हा रुग्णालयात विलगीकरण मध्ये ठेवण्यात आले होते. तसेच त्याचे थ्रोट स्वॅब हे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. 
आज प्राप्त झालेल्या या तपासणीचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आलेला आहे. यामुळे संपूर्ण जिल्हा प्रशासनातच खळबळ माजली आहे. 

No comments

Powered by Blogger.