Header Ads

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पितृशोक


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पितृशोक 

अंत्यविधीला जाणार नाही 



लखनऊ दि.२० - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे पिता आनंदसिंह बिष्ट यांचे दिर्घ आजाराने आज सकाळी १०.४४ वाजता नवी दिल्लीतील एम्स इस्पितळात निधन झाले. ते ८९ वर्षाचे होते. अशी माहिती उत्तर प्रदेशचे अतिरिक्त प्रधान सचीव अवनीश अवस्थी यांनी दिली. 
आनंदसिंह बिष्ट हे उत्तराखंड येथील पौडी जिल्ह्यातील पंचूर या गावाचे रहिवासी होते. काही महिन्यांपासून ते आजारी होते. जास्त त्रास होत असल्यामुळे त्यांना दिल्ली येथील एम्स मध्ये भर्ती करण्यात आले होते. आनंदसिंह हे फॉरेंट रेंजर होते. १९९१ मध्ये निवृत्ती नंतर ते स्वगावी येऊन राहीले होते. 

लॉकडाऊन मुळे योगी अंत्यसंस्कारला जाऊ शकणार नाही 
पुर्वाश्रमीचे आपले जन्मदाता यांचे निधनावर योगी आदित्यनाथ यांनी आपले दु:ख व शोक व्यक्त केले आहे. तसेच वैश्‍विक आपदेच्या या काळात उत्तर प्रदेशाच्या २३ कोटी जनतेच्या हितार्थ कर्तव्यबोध असल्याने आपण अंत्यसंस्कारला येऊ शकणार नाही असेही त्यांनी या संदेशात म्हटले आहे. तसेच लॉकडाऊन नियमांचे पालन करुन कमीत कमी लोकांच्या संख्येत अंत्यसंकार करावेत असेही त्यांनी सांगितले आहे. 

No comments

Powered by Blogger.