Header Ads

पुर्व परवानगी शिवाय मदतीसाठीही रस्त्यावर उतरु नये


मदतीच्या नावाखाली नियमभंग करणार्‍या व्यक्ती, सामाजिक संस्था यांना जिल्हाधिकारी यांची समज 


पुर्व परवानगी शिवाय मदतीसाठीही रस्त्यावर उतरु नये - जिल्हाधिकारी 


वाशिम (जनता परिषद.) दि.२ - आजमितीला संपूर्ण जगत हे कोरोना ह्य न दिसणार्‍या जीवघेण्या राक्षसापायी त्रस्त झाले आहे. अशा वेळी गोर-गरीब जनतेच्या, कर्तव्यावर असणार्‍या पोलिस व आरोग्य विभागासाठी अनेक अशासकीय व्यक्ती व संस्था ह्या संकटकाळी मदतीसाठी समोर येत आहेत. मात्र ह्या सर्व अशासकीय व्यक्ती व संस्था यांचे साठी मार्गदर्शक तत्वे व नियम वाशिमचे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यानी जाहीर केले आहेत. यानुसार कोणत्याही प्रकारे प्रशासनाची अनुमती घेतल्याशिवाय कोणीही प्रशासनाचे नियमांना तटा जाईल असे कृत्यू करु नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे एका आदेशानुसार आज दि. ०२ एप्रिल रोजी बजावण्यात आले आहे. 
कोरोना ह्या रोगाचा प्रसार रोखणेसाठी कोव्हिड-१९ या विषाणूचा संसर्ग प्रतिबंध करणेसाठी विविध उपाय योजना राबविण्यात येत असून वेळोवेळी आदेश देण्यात येत आहेत.  भारत सरकार व राज्य शासनाने संपूर्ण लॉकडाऊन घोषीत केले आहे. त्या अन्वये जिल्हाधिकारी वाशिम यांनीही कलम १४४ नुसार संचारबंदी लागू केलेली आहे. 
Social Distancing, संचार बंदीचे पालन करणे, गर्दी होऊ न देणे सारख्या उपाय योजनांची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. मात्र गरजू लोकांना विविध सामाजिक संस्था व खाजगी व्यक्ती मदत करण्यासाठी संचार बंदीचे सर्रास उल्लंघन करुन काम करीत असल्याचे दिसून आलेले आहे. अशा गरजू व्यक्तींना सामाजिक स्वयंसेवी संस्थांनी व व्यक्तींनी मदत करणे हे निश्‍चितच चांगली बाब होय. परंतू अशी मदत/वाटप हे संचार बंदीचे नियम, डेलळरश्र ऊळीींरपलळपस व इतर शासकीय नियमांच्या अधीन राहून करणे हे ही तितकेच महत्वाचे आहे. जेणेकरून कोरोना कोव्हिड १९ विषाणूचा प्रतिबंध होण्यात मदत होऊ शकेल. संपूर्ण लॉकडाऊन सुरु असतांना काही स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक, खाजगी व्यक्ती हे संचार बंदीचे उल्लंघन करुन मदतीसाठी एका गावातून दुसर्‍या गावामध्ये तसेच शहरातून ग्रामीण भागामध्ये, शहराच्या एका भागातून दुसर्‍या भागामध्ये फिरत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. अशा कृतीमुळे एखादा कोरोना संसर्ग बाधीत रुग्ण शहराच्या दुसर्‍या भागात, दुसर्‍या गावात संसर्ग फैलावू शकते, याची शक्यता नाकारता येत नाही. 
त्यामुळे कोराना कोव्हिड-१९ विषाणूच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी कोणत्याही स्वयंसेवी संस्थेला, खाजगी व्यक्तीला नागरिकांना मदत करावयाची असल्यास, त्यांनी Social Distancing, संचार बंदीचे नियम व इतर शासकीय नियमांच्या आधिन राहून मदत वाटप करणे आवश्यक असल्याने अशा मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाची पुर्व परवानगी घेणे आवश्यक असेल. तसेच कोणत्याही राजकीय व्यक्तींनी, स्वयंसेवी संस्थांनी, खाजगी व्यक्तींनी शासनाकडून चालविल्या जाणार्‍या राशन स्वस्त धान्य दुकान याठिकाणी बसून आर्थिक मदत वा इतर मदत करु नये. तसे करण्यास या आदेशान्वये बंदी करण्यात आलेली आहे. 
या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या व्यक्तीचे विरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ३४, साथरोग अधिनियम १८९७ व भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. असे आदेश वाशिमचे जिल्हाधिकारी व जिल्हादंडाघीकारी हृषीकेश मोडक यांनी एका पत्रकाद्वारे दिले आहे. 

1 comment:

Powered by Blogger.