Header Ads

जिल्हा पोलिस अधिक्षक परदेशी यांची रुटमार्च ची संकल्पना


जिल्हा पोलिस अधिक्षक परदेशी यांची रुटमार्च ची संकल्पना 
फ्लॅगमार्च व रुटमार्च द्वारे पोलीस दलाचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊन दरम्यान वाशिम जिल्हा पोलिस दलाचे आयोजन

वाशिम दि.८ - देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्र सरकार तर्फे २५/०३/२०२० पासून संपूर्ण देशात २१ दिवसांची टाळेबंदी जाहीर करण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यात संचारबंदी, दारुबंदी चे आदेश जिल्हाधिकारी यांचे मार्फत काढण्यात आले. वाशिम जिल्हा प्रशासनातर्फे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन ठोस पावले उचलत असतांना काही समाजकंटक कायद्याचे उल्लंघन करुन आपले कोणी काही विघडवू शकत नाही या अविर्भावात संचारबंदीचे उल्लंघन करुन अवैध दारू विक्री करणे, अवैध मानवी वाहतूक करणे, गावठी दारु गाळणे अशा प्रकारचे संचारबंदीचे उल्लंघन करणारे प्रकार करु लागले. ह्या सगळ्यावर आळा बसणे गरजेचे असल्याने पोलिस दलाचा ताण, जबाबदार्‍या जास्तच वाढल्या आहेत. त्यातल्या त्यात लॉकडाऊन चे काळात संचारबंदी असलेल्या राज्यात पोलिसांवर होणारे प्राणघातक हल्ले सुरुच असल्याचे दिसून आले.
जिल्हा पोलिस अधिक्षक परदेशी यांची रुटमार्च ची संकल्पना 
समाजकंटकांना कायद्याचा बडगा दाखविणे व सगळ्या प्रकारामुळे २४ तास ड्युटीवर असलेल्या पोलिस अधिकारी / कर्मचारी यांचे मनोबल वाढवून वाशिम जिल्हा पोलिस दलाचे सामर्थ्य दाखविणे गरजेचे वाटल्याने वाशिम जिल्हा पोलिस अधिक्षक मा.श्री. वसंत परदेशी यांच्या संकल्पनेतून रुटमार्च हि संकल्पना अंमलात आणण्यात आली. 
त्यांचे आदेशानुसार प्रत्येक उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी आपापले विभागात पोलिस ठाणे निहाय दिनांक ७ एप्रील रोजी फ्लॅगमार्च/रुटमार्च चे आयोजन केले.
0 वाशिम शहर २ उपविभागीय पोलिस अधिकारी, ०८ अधिकारी, १४० कर्मचारी, १० होमगार्ड.
0 वाशिम ग्रामीण अंतर्गत हिवरा, रोहिला, तामशी फाटा येथे १ अधिकारी, २५ कर्मचारी आरसीपी पथक.
0 रिसोड पोलिस स्टेशन अंतर्गत शहर येथे ०४ अधिकारी, ४० कर्मचारी, ०१ स्ट्रायकिंम फोर्स
0 शिरपूर टाऊन येथे ०१ अधिकारी, ०९ कर्मचारी, ०१ स्ट्रायकिंग फोर्स, ०२ होमगार्ड
0 मालेगांव पोलिस स्टेशन अंतर्गत ग्राम मेडशी येथे ०३ अधिकारी, १५ कर्मचारी, ०४ होमगार्ड
0 मंगरुळपीर पोलिस स्टेशन अंतर्गत ०३ अधिकारी ३५ कर्मचारी, ०४ होमगार्ड
0 आसेगांव येथे ०२ अधिकारी, २१ कर्मचारी
0 अनसिंग येथे ०२ अधिकारी, १६ कर्मचारी
0 जऊळका येथे ०१ अधिकारी, ०९ कर्मचारी
0 कारंजा शहर येथे ०५ अधिकारी, १२ कर्मचारी, ०१ स्ट्रायकिंग फोर्स, १५ होमगार्ड
0 कारंजा ग्रामीण अंतर्गत मनभा, उंबर्डा येथे ०२ अधिकारी, ३० कर्मचारी
0 मानोरा येथे ०१ अधिकारी, २५ कर्मचारी, ०८ होमगार्ड
0 धनज येथे ०३ अधिकारी, १८ कर्मचारी, १ आरसीपी पथक
अशा प्रकारे रुटमार्च करुन पोलिस दलाची ताकत जनमानसात दाखवून दिली. कायद्याचे उल्लंघन करेल त्याला कायद्याचा बडगा दाखविल्याशिवाय राहणार नाही.
तरी नागरिकांनी थोडा संयम दाखवून आपल्या देशाला ह्या कोरोना सारख्या वैश्‍विक महामारीच्या संकटातून बाहेर काढण्याकरीता आपआपल्या घरातच रहावे व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक वसंत परदेशी यांनी जिल्ह्यातील जनतेला केली आहे. 

No comments

Powered by Blogger.