Header Ads

कारंजाचे तहसीलदार धिरज मांजरे यांचे नागरिकांना जाहीर आवाहन


कारंजाचे तहसीलदार धिरज मांजरे यांचे नागरिकांना जाहीर आवाहन
बॅकेतून पैसे काढण्यासाठी गर्दी करु नका

वाशिम (जनता परिषद) दि.७ - देशात कोरोना बाधीत रुग्णांची वाढती संख्या व कोरोनाच्या संसर्गाची तिसर्‍या टप्प्याकडे होत असणारी वाटचाल विचारात घेता, नागरिकांनी घ्यावयाची दक्षता काही नागरीक पुरेशा प्रमाणात घेतांना दिसून येत नाही. लॉकडाऊन मुळे गरीब नागरिकांचे हाल होऊ नये म्हणून शासनाने विविध योजनेच्या माध्यमातून नागरिकांच्या बँक खात्यामध्ये निधीची तरतुद केलेली आहे. त्यामुळे बँकांसमोर खुप मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, Social Distancing चे पालन होतांना दिसून येत नाही. परिनामी कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका संभवत आहे. आपल्या खात्यात जमा झालेले पैसे आपल्याच खात्यात जमा राहणार आहेत. ते पैसे परत जाणार नाहीत. त्यामुळे गरज नसल्यास पैसे काढण्यासाठी गर्दी करु नये, असे आवाहन एका पत्रकाद्वारे कारंजाचे तहसीलदार तथा दंडाधिकारी धिरज मांजरे यांनी केले आहे. 

गरजू नागरिकांनी लॉकडाऊनच्या कालावधीत पोष्ट विभाग मार्फत सुरु करण्यात आलेल्या Adhar Enable Payment System इंडीया पोष्ट पेमेंट बँक मार्फत राष्ट्रीयकृत बँकेतील पैेसे घरपोच मिळू शकतात. त्याबाबतची माहिती खालील प्रमाणे आहे. 
१. संपर्क क्रमांक : ०७२४-२४१५०३९
२. संपर्काची वेळ : सकाळी ९.३० ते दुपारी ०२.०० वाजेपर्यंत 
३. पुरवावयाची माहिती : नाव., पत्ता, मोबाईल क्र. आवश्यक असणारी रक्कम, बँकेचे नांव, खाते क्रमांक व IFSC CODE
४. काढण्यात येणारी रक्कम (मर्यादा) : १०,०००/- (दहा हजार) रुपये 

(टिप : १) कारंजा डज २) उंबर्डा ३) वाई ४) पोहा ५) लोणी अरब ६) शहा ७) मनमभा ८) येवता ९) सकळी १०) जांब ११) झोडगा १२) यावर्डी १३) खेर्डा १४) विळेगांव १५) काजळेश्‍वर १६) कामरगांव १७) भांमदेवी १८) लाडेगांव १९) धनज खु. २०) हिंगणवाडी २१) धनज बु. २२) पिंप्री मोडक या पोष्ट ऑफीस मध्ये जाऊन सुद्धा राष्ट्रीयकृत बँकेतील रक्कम काढता येतील.)

No comments

Powered by Blogger.