Header Ads

स्व.अमरनाथजी तिवारी फाऊंडेशनचे वतीने गरजूंसाठी अन्नछत्र

स्व.अमरनाथजी तिवारी फाऊंडेशनचे वतीने गरजूंसाठी अन्नछत्र 

६ दिवसांपासून गोरगरीब व गरजूंसाठी झटत आहेत तरुण मित्र मंडळी



कारंजा (जनता परिषद) दि.२९ - लॉकडाऊनचे काळात गोरगरीब व गरजूंसाठी कारंजा येथे स्व.अमरनाथजी तिवारी फाऊंडेशन चे वतीने अन्नछत्र चालविले जात आहे. शहरातील दानशुर व्यक्तींद्वारे देण्यात आलेल्या मदतीच्या सहकार्याने कोरोनाच्या या महामारीचे काळात भुकेल्यांना अन्न ह्यासाठी कार्य केले जात आहे. आपले कर्तव्य म्हणून फाऊंडेशनचे माध्यमातून अनेक तरुण मित्र मंडळी यांनी स्वत:ला या कार्यासाठी वाहून घेतले आहे. 
२३ एप्रील पासून दररोज नियमीतपणे स्थानीक महेश भवन येथे भाजी, पोळी व लोणचे यांचे पाकीट बनवून तयार करण्यात येते. त्यानंतर शासनाचे आदेशानुसार व सोशियल डिस्टंसींगचे काटेकोरपणे पालन करुन गरजूंपर्यंत हे पाकीट पोहोचविण्यात येते, हा फाऊंडेशनचा नित्यक्रम आहे. 
आपले परिसरातही कोणी गरजू असेल तर त्यांचेपर्यंत हे फुड पॅकेट पोहोचविणे करीता (९२८४६९०२७७ / ९७६५०११५१० / ९८२२९८३९२६) या मोबाईल नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन फाऊंडेशनचे वतीने करण्यात आलेले आहे. 
या सामाजीक कार्यात ललीत तिवारी, मनमोहन उसरेटे, मारुती खुरसडे, संदिप कुर्‍हे, तेजपाल भाटीया, अमित संगेवार, आशिष तांबोडकर, अभिनव तापडीया, अमोल गढवाले, आशिष गावंडे, संतोष शेलवंटे, राजेश कश्यप आदी स्वयंसेवक आपली सेवा देत आहेत. 


No comments

Powered by Blogger.