Header Ads

सामाजिक बांधिलकी : गरजूनां डालडा,रवा व साखरेचे वितरण


सामाजिक बांधिलकी : गरजूनां डालडा,रवा व साखरेचे वितरण

सामाजिक समता प्रबोधन मंच व समाजक्रांती आघाडी चा उपक्रम
400 कुटूंबियांना पहिल्या दिवशी केला वाटप, आणखी तीन दिवस वाटप करणार

          कारंजा (जनता परिषद) -  कोविड 19 मूळे    लॉकडाउन  सुरू  आहे,त्यामुळे घरात असलेल्या गोरगरीब लोकांच्या मदती साठी अनेक सामाजिक संघटना पुढे येत आहेत. अशातच सामाजिक समता प्रबोधन मंच व समाजक्रांती आघाडी च्या वतीने दिनांक 10 एप्रिल रोजी गौतम नगर व रमाई परिसरातील जवळपास 400 कुटूंबियांना डालडा,रवा व साखर असलेल्या किटचे घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले. हा वाटप कारंजा शहरातील विविध परिसरात दिनांक 13 एप्रिल पर्यंत करण्यात येणार आहे.
   महात्मा जोतिबा फुले जयंती व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घरी असलेल्या गोरगरीब गरजवंताना दोन घास गोड अन्न मिळावे म्हणून डालडा,रवा व साखरेचे वाटप 10 एप्रिल ते 13 एप्रिल पर्यंत शहरातील विविध भागात करायचा मानस   सामाजिक समता प्रबोधन मंचचे  समन्वयक   तथा समाजक्रांती आघाडीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष हंसराज शेंडे यांनी व्यक्त केला.
     आज पहिल्या टप्प्यात सकाळी  8 ते 10 या वेळात कारंज्याचे तहसीलदार यांची परवानगी घेऊन गौतम नगर व रमाई परिसरातिल गरजूनां डालडा, रवा व साखरेचे वितरण करण्यात आले.
     सदर वितरण करतेवेळी सामाजिक समता प्रबोधन मंचचे  प्रा.वासुदेव भगत,प्रविण कानकिरड,विजय वानखडे, विनायक पदमगिरवार,प्राचार्य दयावान गव्हाणे, के.जी.ताटके, ज्ञानेश्वर खंडारे,विजय भड सोशल डिस्टनसिगचे तत्व पाळून, मास्क घालून सहकार्य करून लोकांना घरातच रहाण्याचे आवाहन करत होते.

No comments

Powered by Blogger.