डाक विभागामार्फत राष्ट्रीयकृत बँकेतून रक्कम काढण्याची घरपोच सुविधा
डाक विभागामार्फत राष्ट्रीयकृत बँकेतून रक्कम काढण्याची घरपोच सुविधा
· सकाळी ९.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत नाव नोंदवा
वाशिम, दि. ३० : ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिकांनी घरातच राहणे आवश्यक आहे. त्यामुळे या काळात वाशिम व अकोला जिल्ह्यातील नागरिकांना राष्ट्रीयकृत बँक खात्यातून १० हजार रुपये पर्यंत रक्कम घरबसल्या काढण्याची सुविधा डाक विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लॉकडाऊनच्या काळात डाक विभागामार्फत जनतेला बचत बँक सुविधा, टपाल वाटप, रजिस्टर बुकिंग, स्पीड पोस्ट बुकिंग या सुविधांसोबतच राष्ट्रीयकृत बँक खात्यातून १० हजार रुपयेपर्यंत रक्कम काढून पोस्टमनमार्फत अदा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणाऱ्या नागरिकांना आपल्या खात्यातून घरबसल्या रक्कम काढावयाची असल्यास त्यांनी अकोला डाक विभागाचे प्रवर अधीक्षक यांच्या कार्यालयातील ०७२४-२४१५०३९ या क्रमांकावर सकाळी ९.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत आपले नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक व आवश्यक असलेल्या रक्कमेची माहिती नोंदवावी. त्यानंतर पोस्टमन संबंधित व्यक्तीच्या घरी जावून बँक खात्यातून रक्कम काढून अदा करण्याची कार्यवाही करेल, असे अकोला डाक विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
*****
Post a Comment