Header Ads

वाशिम जिल्ह्यात संचारबंदी लागू

वाशिम जिल्ह्यात संचारबंदी लागू

जिल्हाधिकारी हृषिकेश मोडक यांचे आदेश


वाशिमदि. २३ : नोवेल विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लोकांची गर्दी टाळणे हा एकमेव प्रभावी उपाय आहे. त्यामुळे या विषाणूच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम २ अन्वये जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग अधिनियम १८९७ लागू करण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रसाराला तत्काळ प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून जिल्ह्यात २३ मार्च ते ३१ मार्च २०२० या कालावधीत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम २ अन्वये संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी श्री. मोडक यांनी दिले आहेत. संचारबंदी दरम्यान कोणतेही प्रार्थनास्थळ उघडे ठेवता येणार नाही.

या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये, साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम १८९७, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम २ अन्वये आणि भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला, असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
*****



No comments

Powered by Blogger.