Header Ads

नागरिकांच्या मदतीसाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष


नागरिकांच्या मदतीसाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष


वाशिम (जनता परिषद) दि. २९ : ‘कोरोना’मुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत तसेच संचारबंदी काळात जिल्ह्यातील नागरिकांना तत्काळ मदत मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापना करण्यात आला आहे. दूरध्वनीद्वारे ०७२५२-१०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून अथवा  ८३७९९२९४१५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधून किंवा व्हाट्सएप संदेशद्वारे नियंत्रण कक्षाला माहिती अथवा तक्रार देता येईल.

वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम २ अन्वये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात जिल्ह्यातील नागरिकांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी तसेच ‘कोरोना’ विषाणू संसर्गाबाबत योग्य माहिती व मदत उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला आहे. संचारबंदी काळात २४ तास हा कक्ष सुरु राहणार असून जिल्ह्यातील नागरिकांनी या कक्षाच्या टोल फ्री अथवा भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधून तसेच व्हाट्सएपद्वारे आपल्या समस्या मांडाव्यात अथवा माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

*****

No comments

Powered by Blogger.