Header Ads

रुग्णवाहीका धारकांनी अवाजवी दर घेऊ नये

रुग्णवाहीका धारकांनी अवाजवी दर घेऊ नये

कारंजा चे तहसीलदार धीरज मांजरे यांचे आदेश 

    कारंजा (जनता परिषद) दि.३१ - संस्था व वैयक्तीक रुग्णवाहीका चालक/मालक पैकी काही जादा दराने शुल्काची मागणी करीत असल्याचे पार्श्‍वभूमीवर कारंजाचे तहसीलदार मा.धीरज मांजरे यांनी एका आदेशान्वये सक्त ताकीद दिली असून  जादा दर किंवा रुग्णाशिवाय अवैध अशी वाहतूक होता कामा नये असे आदेश आज दि.३१ मार्च रोजी दिले आहे. कारंजा एकूण ११ रुग्णवाहिका सेवा देणार्‍या संस्था, व्यक्तीगत रुग्णवाहिका धारक यांना ह्या बाबत कळविण्यात आलेले आहे. 
कोरोना संचारबंदी दरम्यान मिळालेल्या मौखिक तक्रारीनुसार कारंजा येथील रुग्णांकडून त्यांना घेऊन जातांना जास्त दराची मागणी होत असल्याचे निर्दशनास आल्याची माहिती देत तहसीलदार यांनी वरील आदेश दिले आहेत. तसेच रुग्णवाहिकेमध्ये रुग्ण व त्यांचेसोबत एक किंवा दोन नातेवाईकांचा समावेश असावा असेही सांगितले आहे. 
या आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ३४ व साथ रोग अधिनियम १८९७, कोविड-१९ नुसार कारवाई करण्यात येणार आहे. 
दर तिन दिवसांनी रुग्ण, रुग्णाचा मोबाईल नंबर, रुग्णास रेफर करणार्‍या डॉक्टरचे नांव तसेच कोणते गांवी व कोणत्या डॉक्टर कडे रेफर केले तसेच रुग्णवाहिकेचे देण्यात आलेले शुल्काची पावती व दोन जागांमधील अंतर रिडींगसह व रुग्णाचे किंवा रुग्णाचे नातेवाईकाचे सही निशी विवरण दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.  

No comments

Powered by Blogger.