Header Ads

कारंजा येथे संत रविदास महाराज जयंती उत्सव - sant Ravidas Maharaj jayanti utsav

कारंजा येथे संत रविदास महाराज जयंती उत्सव - sant Ravidas Maharaj jayanti utsav


कारंजा येथे संत रविदास महाराज जयंती उत्सव व चर्मकार समाज मेळावा 24 फेब्रुवारीला

चर्मकार समाजबांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन

कारंजा दि १६ (www.jantaparishad.com) - सामाजिक एकता,बंधुता आणि चर्मकार समाजाचे प्रबोधन या उद्देशाने कारंजा येथे येत्या 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता संत रविदास महाराज जयंती उत्सव (Sant Ravidas Maharaj Jayanti Utsav) व चर्मकार समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

कारंजा ते मंगरूळपीर मार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंप नजीकच्या महालक्ष्मी मंगलम सभागृहात कारंजा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रमूख अतिथी म्हणून राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष समाधान माने,राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा तहसीलदार राजेश वझीरे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या महिला आघाडीच्या प्रदेश सचिव सौ. सीमाताई राजगुरू,महासंघाचे राष्ट्रीय नेते तथा माजी आमदार पुरुषोत्तम राजगुरू,राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे वाशीम जिल्हाध्यक्ष डॉ.दीपक ढोके,राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या महिला आघाडीच्या वाशीम जिल्हाध्यक्ष सौ.विमलताई राजगुरु हे उपस्थित असतील.

या कार्यक्रमात चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थी आणि शासकिय, निमशासकीय सेवेत,बँक तथा अन्य खाजगी क्षेत्रातील सेवेसाठी निवड झालेल्या समाजातील मुलामुलींना उपस्थित अतिथींच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.

दरम्यान या कार्यक्रमाला कारंजा शहर व तालुक्यातील चर्मकार समाज बंधू भगिनींनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या कारंजा तालुका शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.