Header Ads

कारंजा येथे २२ जून रोजी रोजगार मेळावा - Rojgar Melava in Karanja lad

कारंजा येथे २२ जून रोजी रोजगार मेळावा - Rojgar Melava in Karanja lad


कारंजा येथे २२ जून रोजी रोजगार मेळावा

प्रशिक्षण व रोजगार सहाय्य कार्यक्रम’ अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या युवक-युवतींसाठी थेट नोकरीची संधी

वाशिम, दि. १८ जुन (जिमाका): जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम यांच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यांतर्गत २२ जून २०२६ रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), कारंजा लाड येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. (Rojgar Melava in Karanja lad)

हा रोजगार मेळावा विशेषतः ‘प्रशिक्षण व रोजगार सहाय्य कार्यक्रम’ (STEP) अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी आयोजित करण्यात आला आहे. विविध नामांकित आस्थापनांमध्ये उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधींसाठी पात्र उमेदवारांची निवड या मेळाव्यात करण्यात येणार आहे.

मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उमेदवारांना थेट नियोक्त्यांशी संवाद साधण्याची तसेच मुलाखतीद्वारे नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रशिक्षण व रोजगार सहाय्य कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जास्तीत जास्त युवक-युवतींनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

रोजगार इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक कागदपत्रांच्या छायाप्रती, स्वपरिचय पत्र (बायोडाटा), आधारकार्ड, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र तसेच इतर आवश्यक कागदपत्रांसह मेळाव्यास उपस्थित राहावे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त प्रवीण खंडारे यांनी प्रशिक्षण व रोजगार सहाय्य कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व पात्र उमेदवारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपलब्ध रोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.