मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर - Holiday declared for the voting day
मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर
वाशिम, दि.२९ नोव्हेंबर (जिमाका) राज्य शासनाने नगर परिषदा व नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने मंगळवार, दि. २ डिसेंबर २०२५ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी वाशिम जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, कारंजा, मंगरूळपीर नगर परिषद व मालेगाव नगर पंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संबंधित मतदार संघात लागू राहील.
ही अधिसूचना दि. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी जारी करण्यात आली आहे.
निर्वाचन प्रक्रिया सुरळीत पार पडावी, तसेच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सोयीस्कर वातावरण निर्माण व्हावे, यासाठी शासनाने ही सुट्टी लागू केली आहे.
ही सार्वजनिक सुट्टी संबंधित मतदारसंघातील कामानिमित्त बाहेर असणाऱ्या मतदारांना देखील लागू राहील. तसेच या अधिसूचनेनुसार वरील नगर परिषद व नगर पंचायत क्षेत्रातील केंद्र शासनाची कार्यालये, राज्य शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका, वित्तीय संस्था इत्यादींनाही ही सुट्टी लागू राहील, असे अधिसूचनेत नमूद आहे.

Post a Comment