प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी मुदतवाढ - Extension for pre-matric scholarship
प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी मुदतवाढ
वाशिम, दि. 30 ऑक्टोबर (जिमाका) - नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल (National Scholarship Portal) वरील केंद्र पुरस्कृत प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनां (Pre-Matric scholarship) च्या विविध प्रक्रियांमध्ये मुदतवाढ देण्यात आली आहे.
सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: १५ नोव्हेंबर २०२५
- आयएनओ स्तर (एल१) तपासणीची अंतिम तारीख: २५ नोव्हेंबर २०२५
- डीएनओ/एसएनओ स्तर (एल२) तपासणीची अंतिम तारीख: ५ डिसेंबर २०२५
ही मुदतवाढ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्यासाठी अधिक वेळ उपलब्ध व्हावा या उद्देशाने करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यातील निवड झालेल्या टॉप क्लास शाळा/महाविद्यालयांनी, शैक्षणिक संस्था, विद्यार्थी आणि पालकांनी वरील वेळापत्रकानुसार अर्ज व आवश्यक तपासणी प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. यामुळे कोणताही विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहणार नाही, असे आवाहन दीपा हेरोळे, सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, वाशिम यांनी केले आहे.

Post a Comment