Header Ads

बारावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध - Admit card for class 12th exam online download Maharashtra board

बारावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध - Admit card for class 12th exam online download Maharashtra board


बारावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध

Admit card for class 12th exam online download Maharashtra board

मुंबई, दि. 13 : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षा फेब्रुवारी – मार्च २०२५ साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना ही प्रवेश पत्रे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in  या संकेतस्थळावर शुक्रवार दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी ‘ऍडमिट कार्ड’ या लिंक द्वारे डाऊनलोड करण्याकरिता उपलब्ध होतील, असे राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी कळविले आहे. (admit card for class 12th exam online download Maharashtra board)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक / प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना याबाबत सूचित करण्यात आले आहे. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत करण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.