Header Ads

रब्बी बियाण्याकरिता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन - Appeal to apply for rabi seeds on MahaDBT portal

रब्बी बियाण्याकरिता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन - Appeal to apply for rabi seeds on MahaDBT portal


रब्बी बियाण्याकरिता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

वाशिम (जिमाका / www.jantaparishad.com) दि १२ - राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान अन्नधान्य पिके कडधान्य व तृणधान्य तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान गळीतधान्य रब्बी हंगाम २०२४-२५ करिता हरबरा, रब्बी ज्वारी, करडई व मोहरी इत्यादी पिकाचे पिक प्रात्यक्षिके व अनुदानित प्रमाणित बियाणे वितरण हरभरा व रब्बी ज्वारी लक्षांक प्राप्त झाले असुन पिक प्रात्यक्षिके राबविणे, प्रमाणित बियाणे वितरण ह्या बाबी राबविण्यास उत्सुक असणाऱ्या व ओलिताची व्यवस्था असणाऱ्या सर्व संवर्गातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करावा. लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या एका गावातील २५ शेतकरी निवड होईल अश्या गावामध्ये हरबरा, रब्बी ज्वारी व करडई चे प्रती शेतकरी एक एकर या प्रमाणे १० हेक्टर चे पिक प्रात्यक्षिक आयोजित करण्यात येईल.(Appeal of Agriculture Department to apply on MahaDBT portal for rabi seeds)

तसेच अनुदानित प्रमाणित बियाणे वितारणाकरिता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहिती करिता नजीकचे कृषि सहय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आरिफ शाह यांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.