Header Ads

झिका व्हायरस : उपचारापेक्षा, प्रतिबंध बरा - Zika virus: Prevention is better than cure

झिका व्हायरस : उपचारापेक्षा, प्रतिबंध बरा - Zika virus: Prevention is better than cure


झिका व्हायरस : उपचारापेक्षा, प्रतिबंध बरा

सतर्कता बाळगा : आरोग्य विभागाचे आवाहन

वाशिम जिल्ह्यात अद्याप शिरकाव नाही 

वाशिम, दि.18 जुलै (जिमाका / www.jantaparishad.com) - तालुक्यातील देपूळ यांचा संशयित झिका व्हायरस (Zika virus) तपासणीस दिलेला आरटीपीआर नमुन्याचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याने जिल्ह्यात अद्याप झिका व्हायसरचा शिरकाव वाशिम जिल्ह्यात झाला नसल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. तरी नागरिकांनी गाफिल न राहता याबाबत सतर्कता बाळगली पाहिजे. दूषित एडीस इजिप्ती मादी डासांपासून गरोदर महिलांमार्फत तिच्या होणाऱ्या बाळाला झिका व्हायरसची लागण होण्याचा धोका सर्वात जास्त असतो. त्यामुळे येणाऱ्या पिढीवर परिणाम करणारा हा आजार असल्याने त्यावर 'उपचारापेक्षा, प्रतिबंध बरा' (Prevention is better than cure) या उक्तीप्रमाणे घरगुती स्तरापासून कीटकजन्य रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.

झिका हा एडिस डासामुळे पसरतो. एडिस डास हा दिवसा चावतात. झिका विषाणूचा संसर्ग कोणालाही होऊ शकतो. गरोदर महिलांना धोका अधिक असतो.

पावसाळ्यात साथीचे आजार वाढत असतात. यात व्हायरल फिव्हरचाही धोका असतो. यातलाच एक म्हणजे झिका व्हायरस सध्या वाढत आहे.

एडिस डास चावल्यामुळे हा व्हायरस पसरतो. हा डास डेंग्यू आणि चिकनगुनियाही पसरवतो, यासाठी नागरिकांनी डेंग्यूच्या डासाची उत्पत्ती ठिकाणे कमी करण्याची गरज आहे. सततच्या पावसामुळे घराच्या जवळ पाण्याचे डबके साचतात. यात डास अंडी घालून डेंग्यूच्या डासाची उत्पत्ती करतात. हा

झिका आला; आरोग्य सांभाळा

डास चावल्यास झिका व्हायरसची लागण होण्याची शक्यता बळावण्याची शक्यता असते.

झिका हा एडिस इजिप्ती डासामुळे पसरतो. एडिस डास हे दिवसा चावतात. झिका विषाणूचा संसर्ग कोणालाही होऊ शकतो. गरोदर महिलांना धोका अधिक असतो.

पावसाळ्यात साथीचे आजार वाढत असतात. यात व्हायरल फिव्हरचाही धोका असतो. यातलाच एक म्हणजे झिका व्हायरस सध्या वाढत आहे.

एडिस डास चावल्यामुळे हा व्हायरस पसरतो. हा डास डेंग्यू आणि चिकनगुनियाही पसरवतो, यासाठी नागरिकांनी डेंग्यूच्या डासाची उत्पत्ती ठिकाणे कमी करण्याची गरज आहे. सततच्या पावसामुळे घराच्या जवळ पाण्याचे डबके साचतात. यात डास अंडी घालतात. त्यांचे दोन ते तीन दिवसात अळीमध्ये रूपांतर होते. त्यानंतर पुढील तीन ते चार दिवसात त्याचे रूपांतर कोषामध्ये होते. त्यानंतर पुढील एक ते दोन दिवसात कोषामधून प्रौढ डासामध्ये रूपांतर होऊन डेंग्यूच्या डासाची उत्पत्ती होते. 

त्यामुळे सर्व डासोत्पत्ती स्थाने नष्ट करावीत. नष्ट न होणाऱ्या डासोत्पत्ती स्थानामध्ये गप्पी मासे सोडणे. याबाबत जनजागृती करणे. तसेच हा डास दिवसा चवत असल्याने अंगभर कापडवं घालावेत. झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा.

झिका आजाराची लक्षणे काय ?

झिकाची लक्षणे ही सर्वसाधारण आहेत. हात-पाय दुखणे, ताप, त्वचेवर पुरळ येणे, स्नायूदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी, अस्वस्थता यासारखी लक्षणे आढळून येतात 

गर्भवती महिलांना झिकाचा सर्वाधिक धोका असतो. गरोदरपणात झिका झाला असेल तर त्यांच्या गर्भावर त्याचे परिणाम जाणवतात. त्या गर्भाच्या मेंदूची वाढ खुंटते. नवजात बाळाच्या डोक्याचा घेर कमी होतो. त्यामुळे गर्भवती मातांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

... तर डॉक्टरांना भेटा

सांधेदुखी, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलटी होणे, अस्वस्थता जाणवणे, ताप आदी लक्षणे दिसताच डॉक्टरांना भेटण्याची गरज आहे.

लक्षणे काय ?

झिकाची लक्षणे ही सर्वसाधारण आहेत. हात-पाय दुखणे, ताप, चिकनगुनिया, त्वचेवर पुरळ येणे, स्नायूदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी, अस्वस्थता यासारखी लक्षणे दिसून येतात.

गर्भवती महिलांना झिकाचा सर्वाधिक धोका असतो. त्यांना जर झिका झाला असेल तर त्यांच्या गर्भावर त्याचे परिणाम जाणवतात. त्या गर्भाच्या मेंदूची वाढ खुंटते. नवजात बाळाच्या डोक्याचा घेर कमी होतो. त्यामुळे गर्भवती मातांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

... तर डॉक्टरांना भेटा

सांधेदुखी, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलटी होणे, अस्वस्थता जाणवणे, ताप आदी लक्षणे दिसताच डॉक्टरांना भेटण्याची गरज आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.