Header Ads

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या विभागीय तपासणीत कर्मचारी-अधिकारी सर्वच गैरहजर - Gramsevak, Teachers, and workers were found absent during the inspection

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या विभागीय तपासणीत कर्मचारी-अधिकारी सर्वच गैरहजर - Gramsevak, Teachers, and workers were found absent during the inspection


कारंजा तालुक्यातील ग्राम गायवळ येथील प्रकार 

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या विभागीय तपासणीत कर्मचारी-अधिकारी सर्वच गैरहजर

ग्रामसेवकाच्या 2 वेतनवाढ थांबविण्याचे निर्देश

गट विकास अधिकारी, शिक्षक- मुख्याध्यापकासह अंगणवाडी सेविका यांनाही शो कॉज

वाशिम (साप्ताहिक जनता परिषद, कारंजा) दि. २२ - संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत विभागस्तरीय तपासणी करिता आयुक्त कार्यालयातील पथक कारंजा तालुक्यातील गायवळ या गावात गेले असता संबंधित ग्रामसेवकच गावात उपस्थित नसल्याने कोणत्याही तपासणीविना पथक माघारी फिरले. या बाबीची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी गावाच्या ग्रामसेवकासह जि. प. शाळेचे  मुख्याध्यापक, ३  शिक्षक आणि गटविकास अधिकारी यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले. गायवळ येथील ग्रामसेवक  एस. व्ही. राठोड यांच्या दोन वेतनवाढ तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्याचे तसेच पर्यवेक्षणीय कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून गटविकास अधिकारी प्रफुल्ल तोटेवाड यांच्या सेवा पुस्तकेत नोंद घेण्याचे निर्देश सिईओ वाघमारे यांनी दिले. सर्वात विशेष म्हणजे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक पटकावलेल्या कारंजा तालुक्यातील गायवळ गावाची तपासणी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या या पथकामार्फत करण्यात येत होती.

जिल्हा परिषदेची सुत्रे हाती घेतल्यानंतर मुख्य कार्यकारी वाघमारे यांची ही पहीलीच कार्यवाही असुन यामुळे कामात हलगर्जीपणा करणार्‍या कर्मचार्‍यांच्या मनात धडकी भरली आहे.

ग्रामसेवक व इतर संबंधित कर्मचारी गैरहजर तर BDO पोहोचले उशिरा 

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक पटकावलेल्या कारंजा येथील गायवळ आणि प्रथम क्रमांक पटकावलेल्या मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा गावाची तपासणी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या पथकामार्फत करण्यात येत होती. त्यानुसार सकाळी नऊ वाजता अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त (विकास) राजेंद्र फडके हे आपल्या पथकासह  गायवळ या गावाची तपासणी करण्याकरता गावात गेले असता गावातील ग्रामसेवक इतर संबंधित कर्मचारी गैरहजर आढळून आले. गावातील शाळा व अंगणवाडी सुद्धा बंद असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. या सर्व प्रक्रियेचा मुख्य भाग असलेला ग्रामसेवकच गावात हजर नसल्याने गावाची तपासणी न करता तपासणी पथकाला परत यावे लागले. गटविकास अधिकारी तोटेवाड हे सुद्धा गावात उशिरा  पोहोचल्याने उपायुक्त फडके यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी विभागीय आयुक्तांच्या पथकासोबत जिल्हा परिषदेच्या जल जीवन मिशनचे संचालक जगदीश साहू व त्यांची जिल्हा टीम उपस्थित होती. नंतर या पथकाने मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा या गावाची तपासणी केली.

४ शिक्षकांनाही शो काॅज

स्वच्छता अभियानाच्या तपासणी दरम्यान गायवळ येथील जिल्हा परिषद शाळा बंद असल्यामुळे तसेच शाळेत एकही शिक्षक उपस्थित नसल्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक भारत येवले, शिक्षक श्रीकांत सावके, शंकर धनगर, दिनेश गाडगे यांनाही कर्तव्यात कसुर केल्याबाबत  कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश देण्यात आले.

"गायवळ येथील अंगणवाडी सेविका पदमा हरिहर जगताप व मदतनीस  मंगला आनंदा इंगळे यांना नोटीस बजावण्याचे व दोषी आढळल्यास कारवाई करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी दिले "

No comments

Powered by Blogger.