Header Ads

‘आर्ट ऑफ रिअल इस्टेट व्ह्यॅल्युएशन’ - 'Art of Real Estate Valuation' book by Dr Rupesh Laddha



‘आर्ट ऑफ रिअल इस्टेट व्ह्यॅल्युएशन’ 

हे पुस्तक म्हणजे  बँकांना आर्थिक आरिष्ठांपासून वाचवणारी आधुनिक संजिवनी 

मुख्य आयकर आयुक्त डॉ. सुधाकर राव यांचे गौरवोद्गार 

'Art of Real Estate Valuation'

वाशीम (www.jantaparishad.com) दि २० : बँकांना आर्थिक आरिष्ठांपासून वाचवणारी आधुनिक संजिवनी म्हणजे डॉ. रुपेश लढ्ढा (Dr Rupesh Laddha) यांनी इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेले ‘आर्ट ऑफ रिअल इस्टेट व्ह्यॅल्युएशन’ (Art of Real Estate Valuation) हे पुस्तक आहे. माझे तरी स्पष्ट मत आहे की, प्रत्येक बँकेने, पतसंस्थेने ते पुस्तक आपल्या संग्रही आवश्य बाळगावे, असे प्रतिपादन तेलंगानाचे मुख्य आयकर आयुक्त डॉ. सुधाकर राव (Chief Commissioner of Income Tax Dr. Sudhakar Rao) यांनी प्रहास रिसर्च कन्सल्टींग प्रा. लि. (Prahas Research Consulting Pvt. Ltd.) द्वारा प्रकाशित डॉ. रुपेश लढ्ढा यांच्या ‘आर्ट ऑफ रिअल इस्टेट व्ह्यॅल्युएशन’ या पुस्तकाच्या विमोचन प्रसंगी बोलताना केले.

‘आर्ट ऑफ रिअल इस्टेट व्ह्यॅल्युएशन’  - 'Art of Real Estate Valuation' book by Dr Rupesh Laddha


या प्रसंगी आयकर विभागाचे मुख्य आयुक्त डॉ. सुधाकर राव यांनी स्पष्ट केले की, डॉ. रुपेश लढ्ढा यांचे ‘आर्ट ऑफ रिअल इस्टेट व्ह्यॅल्युएशन’ हे एक पुस्तक नसून त्यांची या क्षेत्रातील २७ वर्षांच्या साधनेचा हा अर्क आहे. मी याही पुढे जाऊन म्हणेन की हे पुस्तक १५ वर्षांपूर्वी लिहिल्या गेले असते तर, प्रॉपर्टी अगेन्स्ट लोन या अंतर्गत अनेक बँकांवर आलेले आर्थिक आरिष्ठ टळले असते. किंबहुना प्रॉपर्टी बुडीत कर्जाचे प्रमाण खूप कमी असते.

आज आपण बघता की प्रॉपर्टी असेल, मशनरी असेल अथवा प्लॉट, शेती गहान ठेवून त्याच्या अगेन्स्टमध्ये कर्ज घेतले जाते. त्या प्रॉपर्टी संदर्भात, मशनरी संदर्भात, प्लॉट संदर्भात बँकेच्या अधिकार्‍यांना अगदी सखोल माहिती असते असे नाही. अथवा अशा वेळेस बँकेकडे आलेली प्रॉपर्टी, मशनरी, प्लॉट याचे आर्थिक मुल्यांकन बरोबर आहे अथवा नाही. अशा वेळेस बँकेकडे आलेली प्रॉपर्टी, मशनरी, शेतीचे आर्थिक मुल्यांकन बरोबर आहे अथवा नाही, याचा ठोकताळा देऊ शकणारी बाब म्हणजेच डॉ. रुपेश लढ्ढा यांचे ‘आर्ट ऑफ रिअल इस्टेट व्ह्यॅल्युएशन’ हे पुस्तक आहे. एवढे या पुस्तकाचे अनण्यसाधारण महत्व असल्याचेही डॉ. सुधाकर राव यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

या पुस्तकात डॉ. रुपेश लढ्ढा यांनी प्रॉपर्टी, प्लॉट, शेती, मशनरी याचे आर्थिक मुल्यांकन कसे करावे, त्याचे आर्थिक मुल्यांकन किती असू शकते. या संदर्भात तपशीलवार माहिती दिली आहे. त्यामुळे ते एक पुस्तक नाही, तर बँकांना, पतसंस्थांना आर्थिक आरिष्ठांपासून वाचवणारी गुरूकिल्ली असल्याचे डॉ. सुधाकर राव यांनी यावेळेस बोलताना स्पष्ट केले.

यावेळेस हेल्थकेअर मॅनेजमेंटमधील जगप्रसिद्ध प्रोफेसर मोहम्मद मसूद अहमद, सोलस मीडिया हैद्राबाद ट्रस्ट पीआर एजन्सीचे संचालक डी. रामचंद्रन, माजी प्राचार्य आणि किनोट स्पिकर डॉ. एन. सॅम्युअल बाबू, सायको थेरपिस्ट डॉ. सी. दिव्या आणि प्रसिद्ध चार्टड अकाऊंटंट डॉ. उमाशंकर यावेळेस व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते.

डॉ. रुपेश लढ्ढा (Dr Rupesh Laddha) यांचे पुस्तक ‘आर्ट ऑफ रिअल इस्टेट व्ह्यॅल्युएशन’ (Art of Real Estate Valuation) च्या विमोचनप्रसंगी मान्यवरांसह डॉ. रुपेश लढ्ढा, आर्किटेक्ट मोहनीश लढ्ढा प्रामुख्याने उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.