Header Ads

MPSC 2024 exams Estimated schedule announced - स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

MPSC 2024 exams Estimated schedule announced - स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर


महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत सन २०२४ मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

MPSC 2024 exams Estimated schedule announced

मुंबई, दि.१४ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) सन २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक (MPSC 2024 exams Estimated schedule announced) आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.

आयोगा मार्फत जाहिरात प्रसिद्ध केलेल्या या अंदाजित वेळापत्रकामध्ये  

दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षांमध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ सर्व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा, व मुख्य परीक्षा, 

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त परीक्षामध्ये महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, 

महाराष्ट्र अराजपत्रित गट -ब सेवा मुख्य परीक्षा, 

सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा, 

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा, 

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षामध्ये महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा,  

अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा, 

महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी, 

अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, 

महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा, 

महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, 

महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, 

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, 

निरीक्षक वैद्यमापक शास्त्र मुख्य परीक्षा, 

राज्यसेवा मुख्य परीक्षा, 

महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षांचा समावेश आहे. 

सदर वेळापत्रक अंदाजित असून त्यामध्ये बदल होऊ शकतो. काही बदल झाल्यास त्याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

उमेदवारांनी अधिक माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे उप सचिव दे.वि. तावडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

No comments

Powered by Blogger.