Header Ads

इंडियन सोशल सर्विस युनिट ऑफ एज्युकेशनच्या वतीने वाशिम जिल्ह्यात प्रभावीपणे जनजागृती - Washim District news Indian Social Service Unit of Education

इंडियन सोशल सर्विस युनिट ऑफ एज्युकेशनच्या वतीने वाशिम जिल्ह्यात प्रभावीपणे जनजागृती - Washim District news Indian Social Service Unit of Education

बाल विवाह मुक्त भारत अभियान 

इंडियन सोशल सर्विस युनिट ऑफ एज्युकेशनच्या वतीने वाशिम जिल्ह्यात प्रभावीपणे जनजागृती

वाशिम दि १८ - इंडियन सोशल सर्विस युनिट ऑफ एज्युकेशन आणि ’कैलाश सत्यार्थी चिल्ड्रेन्स फाउंडेशन नवी दिल्ली यांच्या माध्यमातून वाशिम जिल्ह्यातील 50 गावात एकाच वेळी बालविवाह मुक्त भारत अभियानाची प्रभावीपणे जनजागृती व अमलबजावणी करण्यासाठी रॅली आणि कॅन्डल मार्च काढण्यात आला.

यावेळी बाल विवाहामुळे होणार्‍या अनिष्ठ परिणामांची माहिती सांगून, या प्रथेचे निर्मुलन करण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुल ते आंबेडकर चौक पर्यंत रॅली काढण्यात आली. या रॅलीला गोटे कॉलेजचे चहांदजकर यांनी हिरवी झेंडी दिली. सदर रॅलीमध्ये 10 वेगवेगळ्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह 536 नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवली.

तर सायंकाळी आयोजित कॅन्डल मार्च ला इनर व्हील क्लब क्लबच्या शहर अध्यक्षा सीमा राठोड हिरवी झेंडी दाखविली. हा कॅन्डल मार्च  सुद्धा जिल्हा क्रीडा संकुल ते आंबेडकर चौक पर्यंत काढण्यात आला.

भारतामध्ये बालविवाहाचा दर 23 टक्के आहे. 23 पासून दहा टक्के करणे हे आमचे उद्देश्य आहे. आणि 2030 पर्यंत बालविवाहाचा संपूर्ण नायनाट करणे हे आमचं अंतिम लक्ष असून, वाशिम जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण 28 टक्के आहे. सर्वप्रथम ते वीस च्या खाली आणणे हे आमचे लक्ष असल्याचे जिल्हा प्रकल्प समन्वयक डॉ. अनुराग जांभरुणकर यांनी यावेळी सांगितले. यावेळी  बाल लैंगिक शोषण कौन्सिलर अलका वानखेडे, फिल्ड ऑफिसर विनोद अंभोरे, निलेश अंभोरे, ओम साखरकर, राणी भगत, गणेश मगर, स्वयंसेवक, राजेंद्र पडघान आदी इशु चे कार्यकर्ते उपस्थित होते. दोन्ही कार्यक्रमांना शहरातील युवा, तरुण तरुणींनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

No comments

Powered by Blogger.