Header Ads

शांती सदभावना पदयात्रा १२ ऑक्टोबर रोजी कारंजात shirpur dongarpur Shanti sadbhavana padyatra on 12th october

शांती सदभावना पदयात्रा  १२ ऑक्टोबर रोजी कारंजात shirpur dongarpur Shanti sadbhavana padyatra on 12th october


शिरपूर ते डोंगरगढ ही शांती सदभावना पदयात्रा  १२ ऑक्टोबर रोजी कारंजात

कारंजा दि.१० - दिगंबर भाविकांच्या पुढाकारातून शिरपूर ते डोंगरगढ ही शांती सदभावना पदयात्रा शिरपूर वरून 8 ऑक्टोबर रोजी रवाना झाली ती आता कारंजा येथे 12 ऑक्टोबर ला सकाळी सरस्वती भवन येथे भव्य आगमन होणार आहे.

      संतशिरोमणी आचार्य श्री विद्यासागर जी महामुनिराज यांचा पुढील चातुर्मास शिरपूर ला व्हावा या हेतूने पदयात्रा काढण्यात आली.ही पदयात्रा कारंजा मार्गे डोंगरगढ ला पोहोचणार आहे.

            मागील वर्षी 2022 मध्ये जुलै ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत चार महिने आचार्य श्री यांचा चातुर्मास शिरपूर जैन येथे झाला होता त्यावेळी चार महिने देशभरातील भाविक इथे येत होते.आचार्य श्री शिरपूर मध्ये आल्यानंतर त्यांच्या हस्ते बरेच विकासाची कामे सुरू झाली शिवाय 22 एकरा मध्ये भव्य दिव्य पार्श्वनाथ भगवान मंदिर ,मोठमोठ्या धर्मशाळा,हातमाग उद्योग आदी कामे सुरू झाली .या माध्यमातून शेकडो महीलापुरुषांना रोजगार उपलब्ध झाला आहे तर मंदिर परिसरतील छोट्या मोठ्यादुकांदारांना रोजगार उपलब्ध झाले आहे.आज देशभरातून जैन भाविक शिरपूर येथे पार्श्वनाथ भगवान यांच्या दर्शनासाठी येत आहे.

         ही पदयात्रा कारंजा येथे आल्यानंतर सकाळी म.ब्र.आश्रम येथून निघून भारत गॅस चे ऑफिस येथून वाजत गाजत मेन रोड भगवान महावीर मार्ग,महात्मा फुले चौक,बालात्कार जैन मंदिर,काष्टासंघ मंदिर,सेनगण मंदिर नंतर शेवटी सरस्वती भवन येथे आगमन होईल तरी सर्व भाविक भक्तानी याचा लाभ घ्यावा असे आव्हान श्री पपिश कहाते,हितेश रुईवाले,सुदेश गुळकरी,धर्माभाऊ महात्मे, सुमेर आगरकर,हितेंद्र गंधक,गणेश धुरावत,नितीन चढार,संदीप तांगडे,प्रज्वल गुलालकरी, यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.