Header Ads

वाशिम जिल्हा - खरीप पिकांची हंगामी पैसेवारी ६२ पैसे सरासरी - Kharip pik paisewari 2023 in Washim District

वाशिम जिल्हा - खरीप पिकांची हंगामी पैसेवारी 62 पैसे सरासरी - Kharip pik paisewari 2023 in Washim District


वाशिम जिल्हा - खरीप पिकांची हंगामी पैसेवारी 62 पैसे सरासरी 

वाशिम दि.3 ( जिमाका/www.jantaparishad.com) - जिल्ह्यात यंदा पिकाखालील क्षेत्र 2 लक्ष 19 हजार 484 हेक्टर आहे. सन 2023 - 24 या वर्षातील खरीप पिकांची हंगामी पैसेवारी सरासरी 62 पैसे इतकी आहे. जिल्ह्यात एकूण 793 गावे आहेत.या सर्व गावांची खरीप हंगामाची पैसेवारी (Kharip pik paisewari 2023 in Washim District) करण्यात आली आहे. 

यामध्ये 

  1. वाशिम तालुका - 131, 
  2. मालेगाव तालुका - 122, 
  3. रिसोड तालुका - 100, 
  4. मंगरूळपीर तालुका - 137, 
  5. कारंजा तालुका - 167 आणि 
  6. मानोरा तालुका 136 

गावांचा समावेश आहे. खरीप हंगामात पैसेवारी काढण्यात आलेल्या महसूल मंडळाची संख्या 46 इतकी असून यामध्ये वाशिम तालुक्यातील 9, मालेगाव रिसोड व कारंजा तालुक्यातील प्रत्येकी 8 मंडळे मंगरूळपीर तालुका 7 मंडळे आणि मानोरा तालुक्यातील 6 मंडळांचा समावेश आहे.

No comments

Powered by Blogger.