ZP Washim CEO Vasumana Pant reviewed the Meri Maati Mera Desh campaign : सीईओ वसुमना पंत यांनी घेतला मेरी मिट्टी- मेरा देश अभियानाचा आढावा
सीईओ वसुमना पंत यांनी घेतला मेरी मिट्टी- मेरा देश अभियानाचा आढावा
जिल्ह्यातील सर्व गावात कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश
दुरचित्रवाणी द्वारे आयोजित बैठकित दिले निर्देश.
वाशिम (www.jantaparishad.com) :दिनांक 7 ऑगस्ट - जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी दुरचित्रवाणी (व्ही.सी.) द्वारे आयोजित केलेल्या बैठकित शुक्रवारी मेरी मिट्टी- मेरा देश या अभियानाचा सर्व तालुक्याचा आढावा घेतला.(ZP Washim CEO Vasumana Pant reviewed the Meri Maati Mera Desh campaign)
केंद्र शासन व महाराष्ट्र शासानाच्या वतीने देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव समारोपानिमित्त मेरी मिट्टी, मेरा देश है अभियान राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसारदिनांक 9 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट दरम्यान सर्व गावांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या सुचना सर्व तालुक्याचे गटविकास अधिकारी यांना सीईओ वसुमना पंत यांनी यापुर्वीच दिल्या होत्या. त्याबाबत आढावा घेऊन सर्व ग्रामपंचायतीमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश दिले.
केंद्र शासनाच्या आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत विविध कार्यक्रम हाती घेतले होते. त्यानुसार संपूर्ण राज्यात व देशात मेरी मिट्टी, मेरा देश (मिट्टी को नमन, विरो को वंदन) हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यात राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत या अभियानांतर्गत ९ ते १४ ऑगस्टदरम्यान विविध प्रकारचे पाच उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यात 'वसुधा वंदन' उपक्रमांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीत गावातील योग्य ठिकाण निवडून ७४ देशी वृक्षांची लागवड करून अमृत वाटिका तयार करण्यात येणार आहे.
शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहचवा : मुख्य कार्यकारी अधिकारी पंत
शासनाच्या वतीने ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात येणाऱ्या लोक कल्याणकारी योजनांची माहिती लोकांपर्यत पोहचवा, यासाठी गावपातळीवरील सर्व शासकीय- निम शासकीय कर्मचाऱ्यांनी लोकांच्या घरापर्यंत जाण्याची आवश्यकता असल्याची भावना मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी बैठकीत बोलुन दाखवली. यावेळी पंचायत विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत त्यांनी निर्देश दिले. सन २०२३-२४ वर्षाचे पंचायत समिती स्तरावरील विकास आराखडा ऑनलाईन अपलोड करुन वाशीम व कारंजा वगळता उर्वरित चारही पंचायत समित्यांनी विकास आराखडा ऑनलाईन करण्याचे निर्देश दिले.
जोपर्यंत ग्रामपंचायतीच्या जमा खर्चाच्या नोंदी व वार्षिक लेखे ऑनलाईन होणार नाहीत तो पर्यंत ग्रामपंचायतीला वित्त आयोगाचा निधी खर्च करता येत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावरील जमा खर्चाच्या नोंदी PRIAsoft प्रिया सॉफ्टवर ऑनलाईन करून वार्षिक लेखे अद्यावत करण्याच्या सक्त सूचनाही त्यांनी दिल्या.
पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील खर्चाचे प्रमाण अत्यल्प असल्याने सीईओ पंत यांनी आपली नाराजी बोलुन दाखवली. खर्चाचे प्रमाण वाढण्यासाठी सर्व गटविकास अधिकारी यांनी नियमित आढावा घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
यावर्षी पासून होणाऱ्या सर्व ग्रामसभांची नोंद ऑनलाईन होणार आहे. त्याकरिता शासनाने GS-Nirnay App (जीएस निर्णय ॲप) तयार केले असून त्याचा वापर नियमित करण्याच्या सुचना देण्यात आल्या.
सद्यस्थितीत ३३४ ग्रामसेवक आणि १८९ सरपंच यांची GeM पोर्टल वर नोंदणी झाली असल्याचे लक्षात आणुन देत त्यांनी GeM प्रणाली वर सर्व ग्रामपंचायतीची नोंदणी करून ग्रामपातळीवरील सर्व खरेदी प्रक्रिया केवळ GeM द्वारेच करण्याचे निर्देश दिले. ग्रामपंचायत मधील सर्व रजिस्टर- नमुन १ते ३३ नमुना एन्ट्री महा ई ग्राम प्रणाली वर करून गावातील जास्तीत जास्त नागरिकांना Maha eGram Citizen Connect App चा वापर करण्यास प्रोत्साहित करावे, या मोबाईल App द्वारे घरबसल्या विविध दाखले तसेच कराचा भरणा ऑनलाईन पद्धतीने करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत प्राप्त दाखले तात्काळ निकाली काढणे तसेच नागरिकांचे अपील प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचे निर्देशही मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी दिले.
दुरचित्रवाणी (व्ही.सी.) द्वारे आयोजित बैठकीला पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांच्यासह सर्व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांची उपस्थिती होती.
Post a Comment