Header Ads

प्लास्टिकच्या ध्वजाचा वापर व विक्री करू नये - Use &Sale of Plastic National Flag Prohibited

प्लास्टिकच्या ध्वजाचा वापर व विक्री करू नये - Use &Sale of Plastic National Flag Prohibited


 राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा

प्लास्टिकच्या ध्वजाचा वापर व विक्री करू नये

वाशिमच्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांचे आवाहन

वाशिम,दि.१०(जिमाका / www.jantaparishad.com) - १५ ऑगस्ट या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी विद्यार्थी, लहान मुले प्लास्टिक पासून तयार झालेले राष्ट्रध्वज खरेदी करतात.दुसऱ्या दिवशी हे इतरत्र फेकून दिले जातात.तथापि, प्लास्टिकपासून तयार झालेले हे ध्वज लवकर नष्ट होत नसल्यामुळे बरेच दिवस तसेच पडून राहतात.त्यामुळे आपल्या हातून नकळत राष्ट्रध्वजाचा अवमान होतो.तो टाळण्यासाठी प्लास्टिकपासून बनलेल्या लहान राष्ट्रध्वजाची विक्री व वापर करू नये, (Use &Sale of Plastic National Flag Prohibited) असे आवाहन जिल्हाधिकारी  बुवनेश्वरी एस.यांनी केले.

कार्यालये, प्रतिष्ठाने, प्राधिकरणे व इतर संस्थांनी ध्वजारोहणाच्या वेळी ध्वज वापरण्याबाबत भारतीय संहितेमध्ये दिलेल्या तरतुदींमध्ये काटेकोरपणे पालन करावे.तसेच वापरास उपयुक्त नसलेले फाटलेले व जीर्ण,खराब झालेले किंवा रस्त्यावर,मैदानावर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करून ते तालुका जिल्हास्तरीय निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेकडे सुपूर्द करावेत.अशाप्रकारे गोळा केलेले राष्ट्रध्वज तालुका पातळीवर तहसिल कार्यालय व जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करावेत.यासाठी सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय व निमशासकीय कार्यालये, स्वयंसेवी संस्था,पालक सर्वसामान्य नागरिकांनी प्रयत्न करावेत.

१५ ऑगस्ट २०२३ रोजी वाशिम येथील ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात प्रमाणित वेळेनुसार सकाळी ०९.०५ वाजता होणार आहे.ज्या कार्यालयांना अथवा संस्थेला कार्यक्रमाचे आयोजन करावयाचे असेल त्यांनी शासन पत्रानुसार सकाळी ८.३५ वाजेपुर्वी किंवा ९.३५ नंतर ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करावा.सकाळी ८.३५ ते ९.३५ वाजता दरम्यान कोणत्याही कार्यालयाने अथवा संस्थेने ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करू नये.असे निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी कळविले आहे.

No comments

Powered by Blogger.