Header Ads

बातमीत पत्रकारांनी स्वमत टाळले पाहिजे - विलास मराठे - Press should be neutral on the issues & in public interest



बातमीत पत्रकारांनी स्वमत टाळले पाहिजे - विलास मराठे

धाबेकर महाविद्यालयात पत्रकारिता पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात 

(News Credit Shri. Dhyneshwar Ghude)

कारंजा दि.२५ - पत्रकारितेचे व्रत स्वीकारणाऱ्या पत्रकार बांधवांनी बातमी विषयी तटस्थता पाळली पाहिजे. सध्या पत्रकारितेत पीत पत्रकारितेचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला असून हे टाळणे गरजेचे आहे त्यामुळे बातमीत पत्रकारांनी स्वमत टाळले पाहिजे अशा आशयाचे मत दैनिक हिंदुस्थानचे प्रबंध संपादक व इंडियन न्यूज पेपर सोसायटीचे सदस्य विलास मराठे यांनी व्यक्त केले. 


येथील श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालयात  शुक्रवार 25 ऑगस्ट रोजी  झालेल्या पत्रकारिता पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून  ते बोलत होते. 

महाविद्यालयांमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम या पदवीचा कोर्स चालविला जातो. ही पदवी प्राप्त करणाऱ्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष गवई होते. प्रमुख अतिथी म्हणून दैनिक हिंदुस्थानचे प्रबंध संपादक विलास मराठे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य विजय काळे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्राचे प्रमुख प्रा. पराग गावंडे उपस्थित होते.

 या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या वतीने विलास मराठे यांचा शाल स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.  त्यानंतर पदवीकांक्षी विद्यार्थ्यांना विलास मराठे यांच्या हस्ते पदवीचे वितरण करण्यात आले.ज्यांना या पदवीचे वितरण करण्यात आले त्यामध्ये पत्रकार ज्ञानेश्वर घुडे, सुधीर देशपांडे, दिपक पवार व विजय गणेशराव काळे, भारत भगत,राजेश अढाऊ, डॉ.कैलास गायकवाड,प्रा.उमेश कुराडे यांचा समावेश होता

आपल्या भाषणात विलास मराठे पुढे म्हणाले की, पत्रकाराला आपले स्वमत मांडण्यासाठी वृत्तपत्रांमध्ये अनेक स्तंभ आहेत. यामध्ये तो निर्भीडपणे आपले मत मांडू शकतो. बातमीमध्ये मात्र त्याने हे कटाक्षाने टाळले पाहिजे. का? कसे? कोठे? केव्हा? कधी? हे बातमीचे पाच नियम पाळून बातमी तयार व्हावी. नैतिक जबाबदारी सांभाळून पत्रकाराने बातमी तयार करावी. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले की, लोकशाहीचा आधारस्तंभ पत्रकारिता आहे त्यामुळे पत्रकाराला लोकशाहीला प्रगल्भ करण्याची जबाबदारी स्वीकारावी लागेल. पत्रकाराने सत्तेच्या बाजूने नव्हे तर जनतेच्या बाजूने मत मांडले पाहिजे. विजय काळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.ते म्हणाले की, महाविद्यालयामध्ये पत्रकारितेची पदवी मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून आणल्यामुळे माझ्यासारख्या माणसाला ही पदवी संपादन करता आली. पत्रकारितेत रस असणाऱ्या लोकांसाठी महाविद्यालयाने केलेले प्रयत्न वाखाणण्यासारखे आहे. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कैलास गायकवाड यांनी केले. अतिथींचा परिचय प्रा. पराग गावंडे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे संचालन डॉ.अशोक जाधव यांनी केले तर आभार प्रा. राहुल रडके यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. कैलास गायकवाड, डॉ अशोक जाधव, प्रा. उमेश कुराडे, डॉ.योगेश पोहोकार, प्रा. राहुल रडके, प्रा. पराग गावंडे, प्रा. नितेश थोरात, प्रा. लक्ष्मि तेलगोटे, प्रा, प्रियंका खडसे, राजेश आढाऊ, उमेश देशमुख, प्रवीण डफडे, बाळकृष्ण खानबरड, राजू राऊत, प्रकाश लोखंडे, अरुण ईसळ, सुनील राजगुरे यांनी  परिश्रम घेतले.

No comments

Powered by Blogger.