Header Ads

PLACEMENT DRIVE (JOB FAIR) WASHIM - विशेष रोजगार मोहीम : रोजगार इच्छुक उमेदवारांना मिळणार स्थानिक स्तरावरच रोजगार संधी

PLACEMENT DRIVE (JOB FAIR) WASHIM - विशेष रोजगार मोहीम : रोजगार इच्छुक उमेदवारांना मिळणार स्थानिक स्तरावरच रोजगार संधी


विशेष रोजगार मोहीम : रोजगार इच्छुक उमेदवारांना मिळणार स्थानिक स्तरावरच रोजगार संधी

वाशिम कार्यालयाच्या वतीने महिन्यातील प्रत्येक दुसऱ्या गुरुवारी पंडीत दोनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा 

वाशिम,दि.०७ (जिमाका / www.jantaparishad.com) जिल्हयातील नोकरी / रोजगार इच्छुक उमेदवारांना वारंवार नोकरीच्या संधी प्राप्त व्हाव्यात या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम कार्यालयाच्या वतीने महिन्यातील प्रत्येक दुसऱ्या गुरुवारी पंडीत दोनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा (PLACEMENT DRIVE (JOB FAIR) WASHIM) आयोजित करण्याचे निश्चित केले आहे.हा रोजगार मेळावा (प्लेसमेंट ड्राईव्ह) मध्ये प्राध्यान्याने स्थानिक स्तरावरील नियोक्त्याकडील उपलब्ध रिक्तपदांवर रोजगार इच्छूक उमेदवारांना रोजगार/नोकरी मिळविण्याची संधी मिळणार आहे.

याला अनुसरुन १० ऑगष्ट २०२३ रोजी आत्मा प्रशिक्षण हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, वाशिम येथे रोजगार मेळाव्याचे (प्लेसमेंट ड्राईव्ह) आयोजन करण्यात आले आहे. या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये जी.एम.सिरॅमिक प्रा.लि.एम.आय.डी. सी.,वाशिम. एम.नेटप्लस कम्युनिकेशन सव्हिसेस प्रा.लि. वाशिम, होटल इव्हेन्टो,वाशिम, बालाजी बाल रुग्णालय,वाशिम, क्रेडीट एक्सेस ग्रामीण,वाशिम / अकोला. कोअर प्रोजेक्ट इंजीनिअरींग अॅण्ड कम्युनिकेशन प्रा.लि. अमरावती इत्यादी नामांकित कंपनी / उद्योगांकडील उद्योजक या दिनांकीत प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये उपस्थित राहून प्रत्यक्षपणे उपस्थित होणाऱ्या रोजगार इच्छुक उमेदवारांची मुलाखतीद्वारे जागेवरच निवड प्रक्रिया पूर्ण करतील. 

नोकरी इच्छुक उमेदवारांची किमान ८ वी,१० वी,१२वी,आय.टी.आय.(सर्व ट्रेडस्),एन.एम./ए.एन.एम.,पदवीधर (नर्सिंग/कला/वाणिज्य/विज्ञान), अभियांत्रिकी पदविका पदवीधर (स्थापत्य) एम.बि.ए. (एच.आर. व इतर) इ. शैक्षणीक पात्रता असणारे वयोमर्यादा - १८ ते ४५ मधील रोजगार इच्छूक युवक-युवतीना नोकरी मिळवण्याची संधी प्राप्त होणार आहे.तरी जिल्हयातील रोजगार इच्छुक स्त्री पुरुष उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर आपापल्या शैक्षणिक पात्रतेनूसार त्यांचेकडील सेवायोजन कार्डच्या युझरनेम व पासवर्डने लॉगीनद्वारे विविध पदासाठी पसंतीक्रम नोंदवून १० ऑगष्ट २०२३ रोजी स्वतः प्रत्यक्षपणे आवश्यक कागदपत्रांसह स्वखर्चाने उपस्थित राहावे,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केन्द्र,वाशिमचे सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी केले आहे. या रोजगार मेळाव्यात (प्लेसमेंट ड्राईव्ह) सहभागी होण्यासाठी पुढीलप्रमाणे ऑनलाईन पूर्वनोंदणी (Online Registration) करावी. एम्पॉयमेंट कार्डच्या युझरनेम व पासवर्ड (Employment Card User Name and Password) असणे आवश्यक आहे. नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवरील Job Seeker वरील Register वरुन युझरनेम व पासवर्ड मिळवावा. त्यानंतर Job Seeker च्या डोमध्ये लॉगीन करुन डाव्या बाजुकडील पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर (Job Fair) वर क्लीक करावे.येथे वाशिम जिल्हा निवडुन त्यातील PLACEMENT DRIVE (JOB FAIR) WASHIM मध्ये नमुद पात्रतेनुसारच्याच पदांवर अप्लाय करावे.तद्नंतर Applied असा मेसेज दिसेल.या पध्दतीने सदर प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये प्रत्यक्ष उपस्थित होण्यापूर्वी पूर्व नोंदणी करु शकता. काही अडचण उद्भवल्यास या कार्यालयाच्या दुरध्वनी क्र. ०७२५२- २३१४९४ या दुरध्वनीवर संपर्क करावा.असे सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,वाशिम यांनी कळविले आहे.

No comments

Powered by Blogger.