Header Ads

Pik Spardha Yojana 2023 - खरीप हंगाम २०२३ : पिक स्पर्धा योजना

Pik Spardha Yojana 2023 - खरीप हंगाम २०२३ : पिक स्पर्धा योजना


खरीप हंगाम २०२३ : पिक स्पर्धा योजना 

Pik Spardha Yojana 2023

३१ ऑगस्ट अंतिम मुदत

वाशिम, दि. 29 (जिमाका) :  पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढून आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पिक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम सन २०२३ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या 11 पिकांसाठी पिक स्पर्धेचे आयोजन (Pik Spardha Yojana 2023) करण्यात आले आहे.

पिक स्पर्धेची ठळक वैशिष्टे व बाबी 

पिक स्पर्धेसाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या पिकांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र राहील. सर्वसाधारण गटासाठी ३०० रुपये व आदिवासी गटासाठी रक्कम 150 रुपये राहील.  स्पर्धेत भाग घेण्‍यासाठी  शेतकऱ्यांकडे स्‍वतःच्‍या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसत असणे  आवश्‍यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाचवेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. पिकस्पर्धेत सहभाग घेण्यासाठी स्पर्धकास स्वतःच्या शेतावर भात पिकाच्या बाबतीत किमान २० आर व इतर पिकांच्या बाबतीत किमान ४० आर (१ एकर) क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पिकस्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुकास्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.

अर्ज कोठे करावा व अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे 

विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन,  ७/१२, ८-अ चा उतारा, आदिवासी असल्यास जात प्रमाणपत्र, पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, व बँक खाते चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.

पिकस्पर्धा बक्षिसाचे स्वरूप 

सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी राज्य, जिल्हा व तालुका पातळीवरील पीकनिहाय पारीतोषीक रक्कम पुढीलप्रमाणे आहे. 

राज्यस्तरावरील 

  1. प्रथम पारीतोषीक ५० हजार रुपये, 
  2. व्दितीय पारीतोषीक ४० हजार रुपये आणि 
  3. तृतीय पारीतोषीक ३० हजार रुपये. 

जिल्हास्तरावरील 

  1. प्रथम पारीतोषीक १० हजार रुपये, 
  2. व्दितीय पारीतोषीक ७ हजार रुपये आणि 
  3. तृतीय पारीतोषीक ५ हजार रुपये. 

तालुकास्तरावरील 

  1. प्रथम पारीतोषीक ५ हजार रुपये, 
  2. व्दितीय पारीतोषीक ३ हजार रुपये आणि 
  3. तृतिय पारीतोषीक २ हजार रुपये 

देण्यात येणार आहे. 

या खरीप हंगाम सन २०२३ पिकस्पर्धेसाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवानी सहभाग घ्यावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरीफ शहा यांनी केले आहे. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळवर किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

No comments

Powered by Blogger.