Header Ads

मधमाशी पालन योजना / मधकेंद्र योजना - Madhmashi Palan Yojana / Beekeeping Scheme in marathi

मधमाशी पालन योजना / मधकेंद्र योजना -  Madhmashi Palan Yojana / Beekeeping Scheme in marathi


मधमाशी पालन योजना / मधकेंद्र योजना

 Madhmashi Palan Yojana / Beekeeping Scheme 

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ (MSKVIB) मार्फत  मधमाशी पालन योजना / मधकेंद्र योजना (Madhmashi Palan Yojana / Beekeeping Scheme) संपूर्ण राज्यात राबविण्यात येते. या योजनेमुळे शेतकरी व बेरोजगारांना रोजगाराची एक नवी संधी उपलब्ध झाली आहे. तो एक नाविण्यपूर्ण उद्योग आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मधमाशा पालन उद्योगाचे प्रशिक्षण देण्यात येते.

लाभ :

प्रशिक्षण, मधमाशा पालन व्यवसायासाठी लागणारे साहित्य, मधपेट्या , मधयंत्रे पुरवठा.

कार्यपध्दती :

मधमाशापालन योजना महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ (Maharashtra State Khadi and Village Industries Board) मार्फत राबविण्यात येत असून यासाठी महाबळेश्वर येथे मध संचालनलय, कार्यरत आहे. या संचालनालयामार्फत लाभार्थींना प्रशिक्षण देणे, मधमाशा वसाहतींसह मधपेटया तसेच अन्य साहित्याचे वाटप करणे, मध संकलन करुन त्यावर प्रक्रिया करुन विक्री करणे, इत्यादी कामे पार पाडण्यात येते. तसेच जिल्हास्तरावर मंडळाची जिल्हा कार्यालये असून प्रस्तुत योजना राबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून काम करेल.

संबंधीत शासन निर्णय क्र. केव्हिबी-२०१७ प्र.क्र.-१६/उद्योग- ६ दि. १८ जुन २०१९

मधकेंद्र (मधमाशा पालन) योजना :

Madhmashi Palan Yojana in marathi :

राज्यातील सर्व घटकातील लाभार्थींना मधमाशापालन व्यवसायातून उत्पन्न वाढीसाठी मदत करुन त्यांचे जीवनमान उंचावणे आणि मध उद्योगाचा विकास करणे यासाठी पायाभूत सुविधा निर्मिती करणे, त्यांचा दर्जा वाढविणे इ. बाबींची आवश्यकता लक्षात घेऊन राज्यातील मध उद्योगाच्या विकासासाठी असणारे पोषक वातावरण लक्षात घेता पुढील उद्दिष्टे आहेत. व्यावसायिक तत्वावर मध उद्योगाचा व्यवसाय करणारे मधपाळ निर्माण करणे.

  • जनजागृती शिबीर ( मेळावे ) आयोजन करणे : मधमाशापालन उद्योगाच्या प्रचार व प्रसिध्दी होण्यासाठी तालुकास्तरावर अथवा गांवाचा समुह करुन मध्यवर्ती ठिकाणी जनजागृती शिबीर (मेळावे) आयोजीत करण्यात येतील. प्रत्यक जिल्हयात १ ते २ मेळावे आयोजीत करण्यात येतील. मेळावा १ दिवसाचा असेल. एका मेळाव्यात ५० शेतकरी, मधपाळ रहातील.
  • मधमाशा पालन व्यवसाय विशेष प्रशिक्षण : शेतकरी, शाळा कॉलेजचे विद्यार्थी, जेष्ठ नागरीक, शासकीय सेवेतील अधिकारी/कर्मचारी हे मधमाशापालन सुरु करण्यासाठी प्रशिक्षण मिळण्याविषयी मागणी करतात. त्यांना या योजनेअंतर्गत ५ दिवस मुदतीचे प्रशिक्षण देण्यात येईल.

योजनेचे प्रमुख घटक :

(अ) मधपाळ लाभार्थींची निवड करणे

वैयक्तिक मधपाळ पात्रतेच्या अटी –

  • साक्षर असावा.
  • स्वतःची शेती असल्यास प्राधान्य.
  • १८ वर्षापेक्षा जास्त वय असावे.
  • अर्जदाराने मंडळाचे मान्यताप्राप्त प्रशिक्षणकेंद्रात १० दिवसाचे प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहिल.

(ब) प्रगतीशील मधपाळ : 

वैयक्तिक केंद्रचालकासाठी पात्रतेच्या अटी :

  • किमान दहावी पास असावा.
  • २१ वर्षापेक्षा जास्त वय असावे.
  • अशा व्यक्तिंच्या नावे अथवा त्या व्यक्तिच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नांवे किमान एक एकर शेतजमीन असावी किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेत जमीन असावी.
  • लाभार्थींकडे मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादना बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी

संस्था पात्रतेच्या अटी :

  • संस्था नोंदणीकृत असावी.
  • संस्थेच्या नांवे मालकीची किंवा दहावर्षांसाठी भाडयाने घेतलेली कमीत कमी १ एकर शेतजमीन असावी.
  • प्रशिक्षण केंद्र चालविण्यासाठी संस्थेच्या नांवे अथवा भाडयाने घेतलेली किमान ५०० चौ.फूट क्षेत्राची सुयोग्य इमारत असावी.
  • संस्थेकडे मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादन बाबतीत प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले सेवक असावेत. (लाभार्थी मध उद्योग करणा-या परिसरात मधमाशांना उपयुक्त फुलोरा असणा-या वनस्पती, शेती पिके फळझाडे असणा-या परिसरातील लाभार्थीची निवड केली जाईल.

(क) निवडलेल्या व्यक्तिस/संस्थेच्या कर्मचा-यास प्रशिक्षण : 

  1. मधपाळ प्रशिक्षण:- मधपाळास मध संचालनालयामार्फत किंवा संचालनालय ठरवेल त्या संस्था/व्यक्तिमार्फत १० दिवसाचे निवासी प्रशिक्षण देण्यात येईल.
  2. प्रगतीशील मधपाळ प्रशिक्षण प्रगतीशील मधपाळ किंवा संस्थेच्या सभासदास/कर्मचा-यास मध संचालनालय, महाबळेश्वर येथे २० दिवसांचे निवासी प्रशिक्षण देण्यात येईल.

अर्थसहाय्य व अनुदानाचे स्वरुप –

५० टक्के रक्कम ही अनुदान स्वरुपात व ५० टक्के रक्कम ही लाभार्थीचा हिस्सा म्हणून कर्जाच्या स्वरुपात.

मधमाशी पालन योजना / मधकेंद्र योजना (Madhmashi Palan Yojana / Beekeeping Scheme) योजनेंतर्गत मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येते. साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूक अशाप्रकारे या योजनेचे स्वरुप आहे. शासनाच्या हमी भावाने मध खरेदी करण्यात येतो. विशेष (छंद) प्रशिक्षणाची सुविधा देण्यात येते. मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजागृती करण्याचे काम या योजनेंतर्गत करण्यात येते.

No comments

Powered by Blogger.