लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती पिरीपाच्या वतीने उत्साहात साजरी - Lok shahir annabhau sathye jayanti sajari
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती पिरीपाच्या वतीने उत्साहात साजरी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना “भारतरत्नासह” “ज्ञानपीठ” पुरस्कार देण्यात यावा - विलास राऊत
कारंजा दि. ०१ - सोमवार दि.०१ ऑगस्ट २०२३ रोजी लोकशाहीर,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने वस्ताद लहुजी साळवे चौक मंगरूळवेस कारंजा येथे त्यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम अण्णाभाऊ साठे व वस्ताद लहुजी साळवे यांच्या प्रतिमेस पीपल रिपब्लिकन पार्टीचे वाशिम जिल्हा संपर्कप्रमुख तथा कारंजा तालुका अध्यक्ष विलास राऊत प्रगत मित्र मंडळचे विजय गागरे , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक चे माजी जिल्हा संघटक सचिव चांदभाई मुन्नीवाले, विदर्भ लोक कलावंत संघटनेचे अध्यक्ष तथा पत्रकार संजयभाऊ कडोळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या जीवन कार्यावर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
त्यानंतर तहसील कार्यालय येथे अण्णाभाऊ साठे यांना भारत सरकारने भारतरत्न सह साहित्यामधील सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्काराने देण्यात यावा याकरिता पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा जगप्रसिद्ध लॉंग मार्च ठाणे ते माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे सर यांच्या आदेशान्वये कारंजा तालुक्याच्या वतीने प्रधानमंत्री भारत सरकार यांना तहसीलदार कारंजा यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अभूतपूर्व योगदान देणारे आणि आपल्या साहित्यरुपी लेखणीतून समाज परिवर्तनाचे नवक्रांती व परिवर्तनवादी विचार जनमानसात रुजविणारे अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा सर्वोच्च किताब द्यावा. त्याचप्रमाणे लेखक, साहित्य, शाहीर, कथा तथा कादंबरीकार म्हणून संपर्णू जगात साहित्यरुपी क्रांती घडवून आणणारे म्हणून जगात ओळखल्या जाणारे आणि साहित्य क्षेत्रात उत्युंग व्यक्तीमत्व असलेल्या क्रांतीकारी परिवर्तनवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महाराष्ट्राच्या थोर सुपूत्रास - भारतसरकार व्दारा दिल्या जाणारा “भारत रत्न” त्याचप्रमाणे साहित्य क्षेत्रातील “ज्ञानपीठ” पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे अशी प्रमुख मागणी दि.०१ ऑगस्ट २०२३ रोजी त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून, जगप्रसिध्द लाँगमार्च प्रणेते माजी खासदार प्रा. जोगेंद्रजी कवाडे सर यांच्या नेतृत्वाखालील पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने माननीय प्रधानमंत्री,भारत सरकार नई दिल्ली यांना तहसीलदार, कारंजा (लाड) जिल्हा वाशिम मार्फत करण्यात आली.
यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे वाशिम जिल्हा संपर्क प्रमुख तथा कारंजा तालुका अध्यक्ष विलास राऊत, प्रगत मित्र मंडळचे विजय गागरे, चांदभाई मुन्नीवाले, विदर्भ लोक कलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे, बाबाराव डोंगरदिवे, विनायक वरघट, माजी ग्रामपंचायत सदस्य कामरगाव मोसीनभाई, प्रल्हाद शहाकार, अमोल जामणीक, अब्दुल आरिफ, विनोद सावते ,गजानन बोरेकर,सुभाष भगत, अजय अतकरे जगन पंडित, मंगेश आगाशे तथा कारंजा तालुक्यासह शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय गागरे, संचालन विलास राऊत, आभार प्रदर्शन चांदभाई मुन्नीवाले यांनी केले.
Post a Comment