Header Ads

लॉयन्स क्लबच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी ‘उत्सव आजादी का’ शालेय नृत्य स्पर्धा - Lion's club Washim organised Utsav Azadi Ka Dance Competition on the Independace day

Lion's club Washim organised Utsav Azadi Ka Dance Competition on the Independace day - लॉयन्स क्लबच्या वतीने आज ‘उत्सव आजादी का’ शालेय नृत्य स्पर्धा


लॉयन्स क्लबच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी ‘उत्सव आजादी का’ शालेय नृत्य स्पर्धा  

(News Credit - Shri Sandip Pimpalkar)

वाशीम दि १४ (www.jantaparishad.com) - स्वातंत्र्य दिनानिमित्त लॉयन्स क्लब ऑफ वाशीमच्या वतीने ‘उत्सव आजादी का’ अंतर्गत १५ ऑगष्टला स्थानिक वाटाणे लॉन येथे जिल्हास्तरीय शालेय नृत्य स्पर्धेचे आयोजन (Lion's club Washim organised Utsav Azadi Ka Dance Competition on the Independace day) करण्यात आले आहे. दुपारी १२ वाजता आयोजीत कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून लॉयन्स क्लबचे जिज्हा गर्व्हनर लॉ. सुनिल देसर्डा, प्रमुख पाहूणे म्हणून शिक्षक आमदार लॉ. अ‍ॅड. किरणराव सरनाईक, माजी जिल्हा गर्व्हनर लॉ. डॉ. संजय वोरा, विभागीय चेअरपर्सन लॉ. मुरलीधर उपाध्याय, झोन चेअरपर्सन लॉ. भारत चंदनाणी यांची उपस्थिती राहील.

जिल्हास्तरीय शालेय नृत्य स्पर्धेत माध्यमिक गटामध्ये स्व.डॉ. शिवनारायण तोष्णीवाल स्मृती चषक व्दारा शिवउद्योग, प्राथमिक गटामध्ये स्व. निकेता हेमल गांधी /वोरा स्मृती चषक व्दारा डॉ. वोरा हॉस्पीटल, दिव्यांग गटामध्ये स्व. लॉ.डॉ. आय.जी. गंगवाल स्मृती चषक व्दारा लॉ. दीपक गंगवाल, पीपल्स चॉईस अवार्डमध्ये स्व. भवरीलाल कचरुलाल बाहेती स्मृतीचषक व्दारा भगवानदास जमनलाल बाहेती हे चषक ठेवण्यात आले आहेत. स्पर्धेनंतर वसंत वोरा, श्रीमती सुशिलादेवी तोष्णीवाल, लॉ. दीपक गंगवाल, भगवानदास बाहेती यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीसांचे वितरण केल्या जाईल. 

तरी या शालेय नृत्य स्पर्धेला उपस्थित राहून सहभागींचा उत्साह वाढवावा असे आवाहन लॉयन्स क्लब ऑफ वाशीमचे अध्यक्ष मनिष तोष्णीवाल, सचिव स्वप्नील भावसार, कोषाध्यक्ष शैलेंद्र जैन, प्रोजेक्ट चेअरमन पवन शर्मा, आशिष ठाकुर, मिलींद सोमाणी व सर्व सदस्यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.