Header Ads

चांद्रयान ३ चं चंद्रावर यशस्वी लँडिंग - Chandrayaan 3's successful landing on the Moon

चांद्रयान ३ चं चंद्रावर यशस्वी लँडिंग - Chandrayaan 3's successful landing on the Moon


Chandrayaan 3's successful landing on the Moon 

चांद्रयान-३ च चंद्रावर यशस्वी लँडिंग

दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत जगातील पहिला देश 

अंतराळ क्षेत्रात नवा इतिहास रचत, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान ३ मोहीम अंतर्गत 'विक्रम' लँडरने यशस्वीरित्या सॉफ्ट-लँडिंग केले. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगाचं लक्ष भारताच्या चांद्रयान ३ या मोहिमेकडे होतं. भारताचं हे चांद्रयान आज दिनांक २३ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर उतरलं (Chandrayaan 3's successful landing on the Moon). विक्रम लँडरने चंद्रावर सॉप्ट लँडिंग केलं. यासह, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत जगातील पहिला आणि चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणारा चार देशांपैकी एक बनला आहे.  

मोहीम यशस्वी झाल्यानंतर इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ (ISRO Chief S. Somnath) पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि भारतवासियांना संदेश देताना म्हणाले, “We Are on the Moon” (आपण आता चंद्रावर आहोत.)

चांद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंगनंतर देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारतासाठी हा अविस्मरणीय क्षण आहे. हा क्षण नव्या भारताच्या जयघोषाचा आहे. समस्यांचा महासागर ओलांडून आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत. १४० कोटी लोकांचं स्वप्न आज पूर्ण झालं आहे. हा भारताचा शंखनाद आहे. आज प्रत्येक देशवासीयाप्रमाणेच माझंही मन या चांद्रयान मोहिमेशी जोडलं गेलं होतं.

चांद्रयान-३ चा प्रवास : Voyage of Chandrayaan-3

  • दिनांक १४ जुलै : चांद्रयान-३ मोहिमेचे श्रीहरीकोटा येथून दुपारी २.३५ वाजता जीएसएलव्ही मार्क ३ (एलव्हीएम ३) हेवी-लिफ्ट लाँच व्हीकलद्वारे प्रक्षेपण करण्यात आलं.
  • दिनांक १ ऑगस्ट : चांद्रयान चंद्राच्या कक्षेजवळ पोहोचलं. या दिवसापासून चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर करून लँडिंगच्या तयारीला सुरुवात करण्यात आली.
  • दिनांक ५ ऑगस्ट : चांद्रयान ३ चा चंद्राच्या कक्षेत प्रवेश,
  • दिनांक ६ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट : चांद्रयानाने चंद्राची प्रदक्षिणा सुरू केली. तसेच चंद्राच्या पृष्ठभागाकडे प्रवास केला.
  • दिनांक १७ ऑगस्ट : चांद्रयान मिशनमध्ये महत्त्वाचा असलेला लँडर प्रोपल्शन मॉड्यूलपासून यशस्वीरित्या वेगळा करण्यात आला. यानंतर चंद्राच्या दिशेने लँडरचा प्रवास सुरू झाला.
  • दिनांक २० ऑगस्ट : लँडिंगच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली.
  • दिनांक २३ ऑगस्ट : चांद्रयान ३ यशस्वीपणे चंद्रावर उतरलं.

No comments

Powered by Blogger.