Header Ads

सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भूसे यांची समृध्दी महामार्गावरील वारंगी बेस कॅम्प येथे भेट - PWD minister Dadaji Bhuse visited Varangi Base Camp on Samruddhi Mahamarg

सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भूसे यांची समृध्दी महामार्गावरील वारंगी बेस कॅम्प येथे भेट - PWD minister Dadaji Bhuse visited Varangi Base Camp on Samruddhi Mahamarg

सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भूसे यांची समृध्दी महामार्गावरील वारंगी बेस कॅम्प येथे भेट

समृद्धीवरील अपघात शून्यावर आणण्यासाठी प्रयत्नशील - दादाजी भुसे

            वाशिम दि.२१ (www.jantaparishad.com) - सार्वजनिक बांधकाममंत्री दादाजी भूसे (PWD Minister Dadaji Bhuse) यांनी आज २१ जूलै रोजी नागपूर -मुंबई हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गा (Samruddhi Mahamarg) ची पाहणी करतांना मालेगाव तालुक्यातील वारंगी येथील समृध्दी महामार्गावरील बेस कॅम्प (Varangi Base Camp) ला भेट दिली.    

             भेटी दरम्यान श्री.भूसे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले,समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांच्या अपघातांमध्ये भौतिक दृष्टिकोन पाहिला तर समृद्धी महामार्गावरील अपघातांची संख्या सध्या तरी कमी आहे.काही अपघात वाहन चालकांच्या बेजबाबदारपणामुळे होत असल्याचे दिसून येत आहे.अपघातांची संख्या शून्यावर आणण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा मंत्री म्हणून यावेळी त्यांनी आश्वस्त केले.प्रत्येक व्यक्तीचा प्राण आपल्यासाठी महत्त्वाचा आहे.राज्याच्या विकासाच्या दृष्टीने समृद्धी महामार्ग हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. 

            समृद्धी महामार्गावरील वाहनांची वाहतूक दिवसेंदिवस वाढत आहे.तांत्रिकदृष्ट्या काही कमतरता आणि दुरुस्त्या असल्यास त्या लवकरात लवकर पूर्ण करुन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.    

            श्री.भूसे यांच्या आगमनाप्रसंगी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक संजय यादव,व्यवस्थापकीय संचालक (अभियांत्रिकी) अनिल गायकवाड,नागपूरचे सहव्यवस्थापकीय संचालक सुधाकर मूरादे,मुख्य अभियंता साहेबराव सुरवसे,वाशिमचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांच्यासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.