Header Ads

Punyashlok Ahilya Devi Holkar Puraskar / Award - Application Invited : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविले

Punyashlok Ahilya Devi Holkar Puraskar / Award - Application Invited : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविले


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविले

Punyashlok Ahilya Devi Holkar Puraskar / Award - Application Invited

        वाशिम, दि. 11 (जिमाका) : महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ठ काम करीत असलेल्या समाज सेविका व संस्थाच्या कार्याची दखल घ्यावी. तसेच समाजसेविका व संस्थांना पुढे प्रेरणा मिळावी, त्यांच्या समाजसेवेची प्रशंसा व्हावी. जेणेकरून महिला व बालकांच्या उन्नतीसाठी समाज सेविका व संस्थांनी पुढाकार घ्यावा. यासाठी महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ठ काम करीत असलेल्या समाज सेविका (Social Worker Woman) संस्थाना (NGO) राज्य शासनाकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार (Punyashlok Ahilya Devi Holkar Puraskar / Award - Application Invited) जिल्हा,विभाग व राज्यस्तरावर (District Level / Division Level / State Level) देण्यात येतो. सन 2020-21, 2021-22, 2022-23 व 2023-24 या कालावधीतील पुरस्कारासाठी इच्छुक समाजसेविका व संस्थेकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहे.

            राज्य व जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी महिला समाजसेविका तर विभागस्तरीय पुरस्कारासाठी स्वयंसेवी संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत. राज्य पुरस्कारासाठी महिला व बाल विकास क्षेत्रात किमान २५ वर्ष कार्य केलेले असावे. जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी महिला व बाल विकास क्षेत्रात किमान १० वर्ष कार्य केलेले असावे आणि विभागस्तरीय पुरस्कारासाठी स्वयंसेवी संस्था, पब्लिक ट्रस्ट अॅक्ट १९५० किंवा सोसायटीज रजिस्ट्रेशन अॅक्टनुसार नोंदणीकृत असावी. संस्थेचे महिला व बाल विकास क्षेत्रातील सेवा व कार्य ७ वर्षाहून जास्त असावे. यापूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार (Punyashlok Ahilya Devi Holkar Puraskar) / सावित्रीबाई फुले पुरस्कार (Savitribai Fule Puraskar) अथवा दलितमित्र पुरस्कार (Dalit Mitra Puraskar) मिळालेला नसेल, अशा महिला समाजसेविका या पुरस्कारासाठी प्रस्ताव दाखल करू शकतील. अर्जदार महिलांचे कार्य जात, धर्म, पंथ आणि राजकीय पक्षाशी संबंधित नसावे. पुरस्कार मिळण्याची पात्रता व्यक्तिगत मौलिक कार्यावरून ठरविण्यात येईल. समाजातील त्यांच्या पदाचा या बाबतीत विचार करण्यात येणार नाही.

           तरी जिल्ह्यातील पात्र समाजसेविका व स्वयंसेवी संस्थांनी आपले सन 2020-21, 2021-22, 2022-23 व 2023-24 या वर्षासाठीचे प्रस्ताव जिल्हा, विभाग व राज्यस्तरावरील Punyashlok Ahilya Devi Holkar Puraskar / Award - Application Invited : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी विहित नमुन्यात पुढील ठिकाणी सुट्टीचे दिवस वगळून तीन प्रतीत सादर करावेत. प्रस्ताव स्वीकृतीचे निकष पुढीलप्रमाणे आहे. राज्यस्तरावरील पुरस्कारासाठी महिला व बाल विकास क्षेत्रात किमान २५ वर्ष कार्य केलेले असावे. विभागस्तरावरील पुरस्कारासाठी स्वयंसेवी संस्थांनी महिला व बाल विकास क्षेत्रातील सेवा व कार्य ७ वर्षापेक्षा अधिक कार्य केलेले असावे. जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी महिला व बाल विकास क्षेत्रात किमान १० वर्ष कार्य केलेले असावे. सन 2020-21, 2021-22, 2022-23 व 2023-24 पैकी कोणत्या वर्षासाठीचा प्रस्ताव आहे ते नमूद करावे. जिल्हास्तर/विभागस्तर/राज्यस्तर यापैकी जे असेल ते नमूद करावे. वैयक्तिक परिचय पत्र, विना दुराचार प्रमाणपत्र, गैरवर्तनासंबधी खटला किंवा शिक्षा झाली नसल्याचे पोलीस प्राधिकरणाचे प्रमाणपत्र व सार्वजनिक संपत्तीचा अपहार केला नसल्याचे जिल्हाधिकारी यांचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, वाशिम यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.