Header Ads

सामान्य भविष्य निर्वाह निधीचा तपशील ऑनलाईन पाहता येणार - Online : GPF (General Provident Fund) Details can be viewed online

Online : GPF (General Provident Fund) Details can be viewed online

सामान्य भविष्य निर्वाह निधीचा तपशील ऑनलाईन पाहता येणार

मुंबई दि. 21 : भविष्य निर्वाह निधीचे (GPF (General Provident Fund)) २०२२-२३ चे वार्षिक लेखा विवरण (Annual Accounts Statements 2022-23) सेवार्थच्या https://sevaarth.mahakosh.gov.in या संकेतस्थळावर कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले असून त्याची प्रत्यक्ष प्रत (हार्ड कॉपी) देणे थांबविल्याचे महालेखाकार कार्यालयाने प्रसिद्धी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. (Online : GPF (General Provident Fund) Details can be viewed online)

महालेखापाल कार्यालय (Office of the Accountant General) यांनी लेखा आणि कोषागार संचालकांना 2022-23 या वर्षासाठी जीपीएफ लेखा स्लिप प्रदान केल्या असून त्या सेवार्थ या वेबसाइटवर अपलोड केल्या आहेत. कर्मचारी हे विवरण डाउनलोड करून प्रिंट काढू शकतात.

खात्याच्या स्लिपमध्ये विसंगती आढळून आल्यास संबंधित आहरण आणि संवितरण अधिकाऱ्यामार्फत वरिष्ठ उपमहालेखापाल (निधी), महालेखापाल यांच्या निदर्शनास आणल्या जाऊ शकतात. गहाळ क्रेडिट/डेबिट, जन्मतारीख आणि नियुक्तीची तारीख इ. माहिती स्लिपवर छापली नसल्यास, नोंदी पडताळणी आणि अद्ययावत करण्यासाठी agaeMaharshtra1@cag.gov.in या ईमेलवर कळवावे, असेही महालेखाकार कार्यालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

No comments

Powered by Blogger.