MPSC STI Exam 2022 Result Declared : महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा – २०२२ राज्य कर निरीक्षक संवर्गाचा निकाल जाहीर
MPSC STI Exam 2022 Result Declared
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा – २०२२ राज्य कर निरीक्षक संवर्गाचा निकाल जाहीर
मुंबई, दि.8 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ८ ऑक्टोबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ करिता राज्य कर निरिक्षक संवर्गा (MPSC STI Exam 2022 Result Declared) साठी विकल्प दिलेल्या उमेदवारांमधून राज्य कर निरिक्षक (मुख्य) परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल ६ जुलै, २०२३ रोजी जाहीर करण्यात आला आहे.
या संवर्गाकरिता पूर्व परिक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने आवश्यक माहिती तसेच परीक्षा शुल्क विहित, मुदतीत विहित पद्धतीने सादर करणे आवश्यक राहील. त्याशिवाय उमेदवारास मुख्य परिक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही. तसेच पूर्व परिक्षेसाठी सादर केलेल्या अर्जातील दावेच मुख्य परीक्षेकरिता स्वीकारार्ह ठरतील, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
Post a Comment