Header Ads

२८ व २९ जुलै रोजी इव्हीएम मशिनची अभिरुप मतदान प्रक्रीया - MOCK POLL on EVM / VVPAT s on 28 & 29 July

२८ व २९ जुलै रोजी इव्हीएम मशिनची अभिरुप मतदान प्रक्रीया - MOCK POLL of EVM / VVPAT s in Washim District on 28 & 29 July

२८ व २९ जुलै रोजी इव्हीएम मशिनची अभिरुप मतदान प्रक्रीया

मान्यता प्राप्त राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी उपस्थित राहण्याचे निवडणूक विभागाचे आवाहन

        वाशिम, दि. 24 (जिमाका / www.jantaparishad.com) : भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्हयाकरीता EVM / VVPAT s नवीन प्राप्त मशिनच्या प्रथमस्तरीय तपासणी 4 जुलै 2023 पासून सुरु करण्यात आली आहे. या मशिनमध्ये आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे प्रथमस्तरीय तपासणी FLC OK झालेल्या मशिन्सपैकी 1 किंवा 2 टक्के मशिन्सची अभिरुप मतदार प्रक्रीया (MOCK POLL) करण्यात येणार आहे.

            जिल्हयाकरीता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 साठी प्राप्त EVM/VVPATs मशिन्सची अभिरुप मतदान प्रक्रीया (MOCK POLL) नविन EVM/VVPATs गोडाऊन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात 28 व 29 जुलै 2023 रोजी सकाळी 8 वाजतापासून करण्यात येणार आहे. ही प्रक्रीया करतेवेळी मान्यता प्राप्त राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे. असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी, वाशिम यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.